जळगाव जि.प.अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापतीच्या निवडीला स्थगिती

0

जळगाव : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, विषय समिती सभापती तसेच पंचायत समिती सभापती निवडीचा जाहीर झालेल्या कार्यक्रमास स्थगिती देण्यात आली आहे. गुरुवारी रात्री प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार बेडसे यांनी ही स्थगितीची माहिती दरम्यान,  २० डिसेंबरपर्यंत जि.प.ची मुदत असल्याने २१पासून सीईओ डाॅ. बी.एन. पाटील यांच्याकडे प्रशासक म्हणून जबाबदारी येण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी २१ डिसेंबर तर विषय समिती सभापतिपदासाठी २३ डिसेंबर रोजी कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली होती. तसे निर्देश जिल्हा प्रशासनाकडून जिल्हा परिषदेला देण्यात आले होते; मात्र शासनस्तरावरून या तारखांचा कार्यक्रम स्थगित करून पुढे ढकलला असून, नवीन तारखा नंतर जाहीर केल्या जातील, असे पत्र प्रभारी जिल्हाधिकारी डाॅ. नंदकुमार बेडसे यांनी जिल्हा परिषदेला दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.