जळगाव कारागृहाबाहेर दोन तरूणांवर प्राणघातक हल्ला

0

जळगाव । शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात मागील बाजुस कारागृहामध्ये नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेल्या दोन तरूणांना अज्ञात हल्लेखोर चारचाकी वाहनाने येवून प्राणघातक धारदार शस्त्रांने हल्ला केल्याची घटना आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून यात दोघे तरूण गंभीर जखमी झाले आहे.  त्यांना उपचारार्थ डॉ.उल्हास पाटिल रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे.

जळगाव शहरातील कारागृहात बंदीवासात असल्याने फौजी ऊर्फ सनी बालकिशन जाधव (वय-22 रा. रामेश्‍वर कॉलनी मेहरुण),रणजीत इंगळे (वय-29,रा.जैनाबाद) असे दोघेही आपल्या मित्राची भेट घेण्यासाठी कारागृहाच्या बाहेरील धान्य गोदामाजवळ उभे होते. पांढऱ्या रंगाच्या स्वीफ्ट कार मधुन आलेले चौघेही कारागृहात भेटण्यासाठीच आले होते. मात्र, त्यांचा फौजी आणि रणजीत इंगळे यांच्याशी वाद होवून चौघांनी धारदार शस्त्रांनी दोघांवर हल्ला करुन जखमी केल्याची घटना दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. घटनेचे वृत्त कळताच जिल्हापेठ पोलिसांनी धाव घेतली. जखमींना तत्काळ डॉ.उल्हास पाटिल वैद्यकीय महाविद्यालय जळगाव, खुर्द येथे उपचारार्थ रवाना करण्यात आले असून जखमींच्या जबाबानंतर या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात येणार असल्याचे निरीक्षक अकबर पटेल यांनी सांगीतले.

Leave A Reply

Your email address will not be published.