जळगावातील बाजार समितीत सोशल डिस्टन्सिंगच्या अंमलबजावणीसाठी समिती स्थापन

0

जळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी आणि लॉक डाऊन घोषित करण्यात आला आहे. लॉक डाऊन असतानाही जळगाव जिल्ह्यातील शहरी भागातील नागरिक अनावश्यकरित्या रस्त्यांवर फिरुन गर्दी करताना दिसून येत आहे. तसेच सोशल डिस्टन्सींगचे पालन करीत नाहीत. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव येथील मार्केटमध्ये नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच सोशल डिस्टन्ससिंग ची अंमलबजावणी करण्याकरीता समिती स्थापन करण्यात आली असून तसे आदेश उपविभागीय अधिकारी दिपमाला चौरे यांनी निर्गमित केले आहे.

या समितीमध्ये देवेंद्र चंदनकर, नायब तहसीलदार तहसील कार्यालय, जळगाव, सुनील साळुंखे, प्रभाग अधिकारी, महानगरपालिका, जळगाव, आय. बी. तडवी, सहकार अधिकारी, जळगाव, सचिन माळी, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, जळगाव, संदीप हजारे, पोलीस अधिकारी, एमआयडीसी पोलीस स्टेशन, जळगाव यांचा समावेश आहे.

या समिती सदस्यांनी जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांच्या आदेशान्वये लिलावाच्या ठिकाणी गर्दीचे व्यवस्थापन व्यवस्थित होत आहे किंवा नाही, तसेच हात धुण्याची पुरेशी व्यवस्था, हँडवॉश, सॅनिटायजर्स उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सचिव, कृषी उत्पन्न समिती बाजार यांची आहे. उपलब्धतेबाबत सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती यांनी कार्यवाही करावी तसेच लिलावाच्या ठिकाणी अधिकृत नोंदणीकृत खरेदीदार व शेतकरी यांनाच प्रवेश देण्याची मुभा राहील. उपस्थित असणाऱ्या सर्व संबंधितांना मास्कचा वापर करणे व सामाजिक अंतर ठेवणे बंधनकारक राहील. असे उपविभागीय अधिकारी दीपमाला चौरे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.