चुंचाळ्यात गटारीचे पाणी वाहतेय रस्त्यावर !

0

अस्वच्छतेमुळे रोगराईचा फैलाव ; ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष
यावल ( प्रतिनीधी ) तालुक्यातिल चुंचाळे येथील गावाची सख्या जवळपास पाच हजारापर्यन्त आहे . मात्र चुंचाळे ग्रामपंचायतीकडे एकच सफाई कामगार तो ही कधी बंद तर कधी कामावर असल्याने गावात नियमित पणे साफसफाई होत नसल्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे . तसेच गावातील मुख्य व दर्शनीभागातील गटार गेल्या आठ दिवसापासून रस्त्यावरून वाहत आहे . मात्र याकडे संबंधित ग्रामपंचायत डोळे असून दुर्लक्ष करत आहे. या गटारीच्या वाहत्या पाण्यावरून अनेक वाहने ये जा करतात चुकूनजर कुणाच्या अंगावर हे घाण पाणी उडाल्यास मोठा वादविवाद निर्माण होऊ शकतो असे सुज्ञ नागराकांनमध्ये बोलले जात आहे . तसेच काही ठिकाणी गटारीची नियमित साफसफाई होते तर काही ठिकाणी एक ते दिड महिन्यांनी सफाई होते त्यामुळे त्या परिसरात डासाचा प्रादुर्भाव वाढीस लागला असुन त्या परिसरातील रहिवाश्यांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. आधिच कोरोनाच्या भितीने नागरिकांनमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यात काही भागात गटारी नादुरुस्त असल्याने साडपाण्याचे डबके साचले आहे. यातून दुर्गधी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास धोका आहे. आता तरी संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने या गंभीर विषयाची दखल घेत गावात साफसफाई नियमित करणे गरजेचे आहे . गटारी काढणे पिण्याच्या पाण्यात टि.सी.एल पावडर वापरणे काही ठिकाणी पाईप लाईन लिकेज असेल ते दुरुस्त करणे व गावातील सर्वच भागात स्वच्छता अभियान राबवण्यासह गावात डासाचा नायनाट होईल अशी धुरळणीसह फवारणी करणे गरजेचे आहे. महिला शौचालयाजवळ देखील साफसफाई करणे गरजेचे आहे. अशी अपेक्षा चुंचाळ्यातील सुज्ञ नागरिकांकडून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.