चिनावल, विवरासह लोहारा परिसरात वादळाने केळीचे मोठे नुकसान

0

चिनावल ता रावेर दि (वार्ताहर) काल दिनांक २७ रोजी संध्याकाळी ७ वाजेदरम्यान लोहारा  चिनावल ,विवरा वडगाव, वाघोदा परिसरात झालेल्या प्रचंड वादळाने केळी बागांचे मोठे नुकसान झाले आहे.

काल रावेर तालुक्यात दुपारी तापी काठावर तर संध्याकाळी विवरा, चिनावल, लोहारा, कुंभार खेडा  वडगाव ,वाघोदा शिवारात वादळाच्या प्रचंड वेगाने ऐन कापणीवर आलेल्या शेकडो हेक्टर जमिनीवरील केळी जमिनदोस्त झाले आहे या मुळे केळी उत्पादकांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या प्रकोपाने हिरावला गेला आहे. केळी बागांचे लाखो रुपयांचे नुकसान ह्यात झाल्याने शेतकरी रडकुंडीला आला आहे.

कापणीवर असलेल्या केळीच्या उत्पन्नावर भविष्यातील शेतीचे नियोजन करणाऱ्या केळी उत्पादकांना आता उत्पन्न नसल्याने शेती व नविन केळी लागवड कशी करावी याची चिंता सतावित आहे. सर्वात जास्त नुकसान विवरा खु शिवारात झाले आहे. संबंधीत महसूल, कृषी, विभागाने यांची दखल घेवून नुकसान ग्रस्त केळी ते उत्पादकांन च्या केळी चे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मिळणेची तजविज करणेची मागणी केळी पट्ट्यात होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.