चितोडे वाणी समाजाचे डोंबिवलीत स्नेह संमेलन

0

डोंबिवली (प्रतिनिधी) : मुंबई परिसरातील समाज बांधवांसाठी 12 जानेवारीला एक दिवसाची पर्वणी मुंबई आणि परिसरात राहणाऱ्या चितोडे वाणी समाजाबांधवांचे एकदिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन 12 जानेवारी रोजी डोंबिवली येथे आयोजीत करण्यात आले आहे. वधू-वर परिचय मेळावा, गुणवंतांचा सत्कार, विविध स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांसह समीर नारद यांचे ‘यशाचे शास्त्र’ या विषयावर प्ररेणादायी भाषण आणि पुणे येथील शंखनाद कार्यक्रम यामुळे मुंबई आणि परिसरतील समाज बांधवांसाठी स्नेहसंमेलन म्हणजचे एक पर्वणीच ठरणार आहे. या स्नेहसंमेलनाला मुंबई परिसरात राहणाऱ्या समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपिस्थत रहावे असे आवाहन चितोडे वाणी समाज नित्यसेवा प्रतिष्ठानकडून करण्यात आले आहे.

दि.12 जानेवारी रोजी डोंबिवली (पश्चिम) येथील दादासाहेब जोंधळे सभागृहात सकाळी 9 वाजता स्नेहसंमेलनाला सुरूवात होणार आहे. सायंकाळी 5 वाजता समोराप होईल. गणेश वंदना आणि दिपप्रज्वलनाने संमेलानाचे उद्घाटन होईल. यानंतर नाव नोंदणी आणि लहान मुलांसाठी स्पर्धा होती. ‘यशाचे शास्त्र’ या विषयावर समीर नारद यांचे प्रेरणादायी भाषण, उमेश गडे यांचा ‘शंखनाद’ कार्यक्रम होईल यानंतर दुपारी 1.30 ते 2.30 पर्यंत सुरूची भोजन होणार आहे. गृप स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम होतील. यानंतर वधू-वर परिचय मेळावा होवून अभय यावलकर यांचे ‘प्रयोगातून विज्ञान शिक्षण’ या विषयावर मार्गदशन होईल. यानंतर बक्षिस वितरण, आभारप्रदर्शन आणि नंतर पसायदानाने स्नेहसंमेलनाचा समारोप होईल.

या स्नेहसंमेलनाला समाज बांधवांनी मोठ्यासंख्येने उपस्थित रहावे, माहितीसाठी संपर्क साधावा असे आवाहन चितोडे वाणी समाज नित्यसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश खारूळ (मो.9766817807), उपाध्यक्ष श्रीकांत गडे (मो.9821226717), सौ.वैजयंती दिलीप सराफ, सचिव दिलीप यावलकर (मो.90045757), उपसचिव पंकज गजेश्वर (मो.9820962640), खजिनदार उल्हास वाणी व विश्वस्त मंडळाने केले आहे.

वधू – वरांसाठी आवाहन
संमेलनात होणाऱ्या वधूवर परिचय मेळाव्यात सहभागी होवू इच्छिणाऱ्या वधू – वरांनी 5 जानेवारी पर्यत आपली नावे श्रीकांत गडे किंवा पंकज गजेश्वर यांच्याकडे नोंदविणे आवश्यक आहे. दहावी, बारावी, पदविका परीक्षांमधील गुणवंतांनी आपल्या गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत 31 डिसेंबर पर्यंत उपाध्यक्ष व उपसचिवांकडे जमा करावी. मुदतीनंतर कुणाचेही नाव स्विकारले जाणार नाही. स्नेह संमेलनाचे प्रायोजकत्व समाज बांधावांनी स्विकारून सहकार्य करावे असे आवाहन चितोडे वाणी समाज नित्यसेवा प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.