चिंताजनक! देशातील करोनाग्रस्तांची संख्या २ लाखांच्या टप्प्यावर

नवी दिल्ली । देशभरात कोरोनाच्या साथीला रोखण्यासाठी लॉकडाऊनचे ४ टप्पे पार पडले तरी स्थिती नियंत्रणात आलेली दिसत नाही आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्येत आजही वाढ नोंदवली जात आहे. देशातील कोरोनाचे रुग्ण सलग तिसऱ्या दिवशी ८ हजारांहून अधिक संख्येने वाढले. मागील २४ तासांमध्ये देशात ८ हजार १७१ रुग्णांची नोंद झाल्याने एकूण रुग्णांची संख्या १ लाख ९७ हजार ५८१ वर पोहोचली आहे. त्यामुळं कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचा वेग असाच कायम राहिला तर येत्या २ दिवसात देशात कोरोनाबाधितांचा आकडा २ लाखांचा टप्पा गाठेल.

कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेल्या १० देशांमध्ये भारत ७ व्या क्रमांकावर आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत आठवड्यापूर्वी भारत ९ व्या क्रमांकावर होता. आता मात्र देशातील रुग्णांची संख्या फ्रान्समधील रुग्णांपेक्षा जास्त झाली आहे.मागील २४ तासांत देशात २०४ जण कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत ५ हजार ५९८ जणांचा बळी गेला आहे.

समाधानकारक बाब म्हणजे देशात ९५ हजार ५२६ जणांनी कोरोनाचा पराभव केला आहे. तर ९७ हजार ५८१ जणांवर उपचार सुरू आहेत. देशात र%

Comments are closed.