घरगुती वातावरणात पार पडला विवाह सोहळा !

0

जळगाव : लाकडाऊन मुळे सर्वत्र सार्वजनिक समारंभांना बंदी आहे. त्यावत मात करत तालुक्यातील घार्डी येथे घरगुती वातावरणात अगदी मोजक्या परिवाराच्या उपस्थितीत दि. 12 मे रोजी आदर्श विवाह सोहळा संपन्न झाला.

यावल तालुक्यातील मायसांगवी येथील आधार पाटील यांची ज्येष्ठ कन्या व कै.शिवनारायण सिताराम पाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव भूषण यांचा विवाह सोहळा चार महिन्यापूर्वी ठरलेला होता. परंतु सर्वत्र कोरोणाचे संकट सुरु असल्यामुळे व लॉकडाऊन सुरु असल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे दोन्ही घरातील परिवारांनी सल्‍लामसलत करुन तसेच अनेक विविध खर्चांना फाटा देत अत्यंत साध्या पद्तीने आदर्श विवाह करण्याचे ठरविले.

त्यानुसार दि. 12 मे रोजी सकाळी घार्डी येथे मोजक्या परिवाराच्या उपस्थितीत दोघांनी तोंडाला मास्क लावून व सुरक्षित अंतर ठेवून व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन चि. भूषण व चि.सौ.कां. वर्षा यांचा आदर्श विवाह सोहळा संपन्न झाला.

यावेळी गावातील प्रतिष्ठीत व्यक्‍ती सरपंच लिलाधर नथ्थू पाटील, माजी सरपंच साहेबराव सिताराम पाटील, पोलीस पाटील रविंद्र नथ्थू पाटील, तंटामुक्‍ती अध्यक्ष शेखर श्रीराम पाटील, पुरोहित जगदीश कुलकर्णी, दोन्ही परिवारातील आई-वडील, काका, काकू, भाऊ बहिण यांची तोंडाला मास्क लावून व सुरक्षित अंतर ठेवून प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ग्रामस्थांनी आपआपल्या घरातूनच उभयंताना भावी आयुष्यासाठी आशिर्वाद दिले. तसेच काहींनी व्हाट्सअ‍ॅप वरुन शुभेच्छांचा संदेश दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.