ग्रीन फाउंडेशन तर्फ़े राबवण्यात आलेला वृक्षारोपण कार्यक्रम तसेच राज्यस्तरीय वक्तृत्वृ स्पर्धेचा निकाल जाहीर

0

भातखंडे (प्रतिनिधी) लॉकडाउन कालावधीत विध्यार्थी यांच्या सुप्त गुणांना वाव  मिळण्यासाठी मिळालेली अमूल्यवेळ योग्य कामासाठी उपयुक्त व्हावा यासाठी ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य (संस्थापक अध्यक्ष) अमित जगताप यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शासनाच्या नियमाचे पालन करत राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व  स्पर्धा. तसेच लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल येथे १२ फुटी जंगली वृक्षांचे रोपन करण्यात आले.

संपूर्ण महाराष्ट्रातून या  स्पर्धेत प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला   स्पर्धेत तब्बल ८२ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता . स्पर्धकांनी आपले कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न केला या स्पर्धेचा निकाल स्पर्धेचे परीक्षक प्रा.विजयकुमार रामदास घोडके. मराठी विभाग एस. जी. के.कॉलेज लोणी काळभोर पुणे. प्रा. बाळासाहेब जगताप यांच्या  परीक्षणातून जाहीर करण्यात आला होता.

ऑनलाईन वक्तृत्व   स्पर्धेत ८२ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता यामध्ये

१) वृक्ष संवर्धन काळाची गरज २) मी अनुभवलेले अमितदादा जगताप ३) शेतकरी आत्महत्या एक ज्वलंत समस्या ४) माणसातील देवमाणुस पोलिस, डॉक्टर, पत्रकार, नर्स, स्वच्छतादूत या वक्तृत्वचा समावेश होता.

प्रथम क्रमांक –  सिध्दी मयुरी महादेव घाडगे. रा.लोणारे,ता.माणगाव,जि.रायगड

द्वितीय क्रमांक- वैभवी विनायक काळभोर. रा. लोणी काळभोर ता.हवेली जि पुणे.

तृतीय क्रमांक- नेहल योगेश जोशी . सावेडी जि.अहमदनगर

मराठी मातीशी नाळ जोडलेल्या कवी, लेखक ,साहित्यिक, रसिकांमध्ये वाचन आणि लेखनाची आवड निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने राज्यस्तरीय खुली ऑनलाईन वक्तृत्व  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते प्रथमच कोरोणा काळात ऑनलाईन स्पर्धेला  संपुर्ण महाराष्ट्रातुन  चांगला प्रतिसाद मिळाला आहे

ग्रीन फाउंडेशन महाराष्ट्र राज्य  वतीने कोरोणा महामारी च्या लॉक डाऊन काळात  ऑनलाइन खुली राज्यस्तरीय ऑनलाईन  खुली वकृत्व स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेचा निकाल.  साधना सहकारी बॅक व्हा.चेअरमन बाळासाहेब कोळपे,अनिष शेठ  काळभोर,विनोद राईज.सुभाष विरकर, अजय काळभोर,प्रितम पाटील, राहुल कुंभार,.विजय बोडके, विजय सकट ,अभिजीत बडदे, नरेश गिरी,  यांचे उपस्थितीत निकाल जाहीर करण्यात आला. स्पर्धेत सहभागी स्पर्धकातून तीन क्रमांक काढण्यात आले.

बक्षिस वितरण सोहळा ऑनलाईन पध्दतीने १२डिसेंबर  होईल.

Leave A Reply

Your email address will not be published.