गिरीश महाजनांच्या ‘त्या’ आरोपावर आ.शिरीष चौधरींचं प्रत्त्युतर ….म्हणाले

0

रावेर :  भाजपचे माजी मंत्री आणि आमदार गिरीश महाजन यांच्या उपस्थिती सोमवारी केळी पिक विम्याच्या निकषाच्या मुद्द्यावर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी गिरीश महाजन यांनी सरकारवर सरसंधान साधत मंत्र्यांनी खिसे गरम केल्याचा आरोप त्यांनी केला होता. दरम्यान, या आरोपाचे आमदार शिरीष चौधरी यांनी खंडन करून त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले

मंत्री खिसे कसे गरम करतात? याच्या काही पद्धती त्यांना ठाऊक असतील ,ते माजी मंत्री आणि अनुभवी आहेत, त्यामुळे मंत्री खिसे कसे गरम करतात याबाबत तेच सांगू शकतील अशी खरमरीत टीका आ.शिरीष चौधरी यांनी गिरीश महाजन यांच्यावर केली आहे. रावेर येथील पीपल्स बँकेत झालेल्या पत्रकार परिषदेत आ.चौधरी यांनी केळी पिक विम्याच्या बाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली. याप्रसंगी बाजार समितीचे माजी सभापती डॉ राजेंद्र पाटील, माजी जि.प.सदस्य रमेश पाटील, पीपल्स बँकेचे चेअरमन प्रवीण पासपोहे उपस्थित होते.

केळी पिक विम्याचे निकष बदलवून मिळावे यासाठी आम्ही पाठपुरवा करत असतांना,माजी मंत्री महाजन पुढे आले नाहीत, त्यांचे सहकारी राज्य सरकार बैठका घेत असतांना सामील झाले नाही.आता,मात्र मुदत संपल्यावर यासाठी आंदोलनाची भाषा करत आहे, असा वचपाही त्यांनी महाजनांवर काढला

केंद्र सरकार कडून कोणतीच भूमिका न बदलल्याने केळी विम्याचे निकष तेच राहिले.केंद्र सरकार अनेक जबाबदाऱ्या झटकत आहे.त्यासाठी कॉंग्रेस पक्ष सातत्याने भूमिका मांडून त्यांचा खरा चेहरा समोर आणत असल्याचे आ.चौधरी यांनी यावेळी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.