खुल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत जामनेरचा रुपेश बिऱ्हाडे राज्यात पहिला

0

जामनेर (प्रतिनीधी):– कोविड -19 च्या जगभरातील वाढत्या प्रादुर्भावामुळे आपण घरातच कुलूपबंद झालेले आहोत. या टाळेबंदीचे (लाॉकडाऊन) आपल्या कृषी व्यवस्थेवर, शेती, शेतकरी आणि शेती पद्धतीवर कोणकोणते परिणाम होत आहेत. यांवर विचार मंथन घडवून आणण्याच्या हेतूने संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय, मुक्ताईनगर जि. जळगाव यांच्या संयुक्त विद्यामानाने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत जामनेर येथील रुपेश राजाराम बिऱ्हाडे याने प्रथम क्रमांक पटकाविला. ‌‌

टाळेबंदीचे कृषी व्यवस्थेवरील आर्थिक परिणाम हा निबंध स्पर्धेचा विषय होता.रुपेश याने यापूर्वीही निबंध लेखनामध्ये मुंबई, नाशिक, पुणे, धुळे, डोंबविली, कोल्हापूर, जळगाव आपली चमक दाखविली असुन विविध पारितोषिके पटकाविली आहेत. त्याच्या या यशाबद्दल प्राचार्य डाँ.शिरीष पाटील, प्राचार्य डॉ. आय.डी.पाटील, संजय पवार ( प्रकल्प विशेषज्ञ ना.दे.कृ.सं प्रकल्प जळगाव ),अभिमन्यू चोपडे ( तालुका कृषि अधिकारी जामनेर ) प्रा.मिलींद लोखंडे, प्रा.डॉ. अंशुमन मिश्रा यांनी रुपेशचे अभिनंदन केले.त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.