खा.सुप्रियाताई सुळेंनी बी.एन.पाटील यांच्या शैक्षणिक कार्याची घेतली दखल

0

भातखंडे (प्रतिनिधी) : येथील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या भातखंडे माध्यमिक विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक बी एन पाटील यांना नुकताच मिळालेला न्यूज प्राईड ऑफ कोल्हापूर यांच्यातर्फे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार मिळाल्याने उत्कृष्ट संसदपटू  तथा बारामती लोकसभा मतदार संघाच्या  लोकप्रिय खासदार  सौ सुप्रियाताई सुळे यांनी त्यांची विशेष दखल घेतली असून त्यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

शुभेच्छा संदेशात पुढीलप्रमाणे उल्लेख  केलेला आहे. श्री भिकन नामदेव पाटील(बी एन पाटील)सर उपक्रमशील शिक्षक कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालय भातखंडे बुद्रुक तालुका भडगाव जिल्हा जळगांव यांनी विद्यार्थी हितासाठी   कोरोना विषाणू महामारी प्रसंगी कोविड:-१९ काळात  समाजापुढे एक आदर्श प्रस्थापित केला  या महामारी प्रसंगी शासनाने निर्देशित केल्यानुसार “शाळा बंद पण शिक्षण चालू” या धोरणानुसार  विद्यार्थ्यांसाठी   विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून वेगवेगळे अभिनव उपक्रम राबवून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी वाड्यावस्तीवर जाऊन इंग्रजी विषयाबाबत  विद्यार्थ्यांच्या  शैक्षणिक समस्यांचे निराकरण करण्याचे काम केले.

आणि त्याला उत्तम असा प्रतिसाद मिळाला त्यांच्या    उल्लेखनीय कार्याबद्दल प्राइड न्यूज कोल्हापूर  यांच्याकडून  राज्यस्तरीय  गुणवंत शिक्षक पुरस्काराने नुकतेच सन्मानित केले. अभिनंदन तुमच्या कृतिशील, अनुकरणीय, शैक्षणिक कार्यास भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा !! दिल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.