खा.रक्षा खडसेंकडून बोदवड येथे सॅनीटायझरचे वाटप

0

बोदवड (प्रतिनीधी):- जगभरात कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता या विषाणूचा तालुक्यात प्रसार होवू नये तसेचं या विषाणूला हद्दपार करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा आपला जीव मुठीत धरून अहोरात्र मेहनत घेत आहेत.या विषाणूला हद्दपार करण्यासाठी या लढाईत कोरोना योध्दांची ढाल म्हणून सॅनीटायझर हे प्रभावीपणे काम करीत आहे.

त्यामुळे या कोरोना योध्दांची ढाल असलेल्या सॅनीटायझरचे वाटप येथील मेहनत घेत असलेल्या तालुक्यातील विविध प्रशाकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना माजी महसुलमंत्री एकनाथ खडसे यांच्या संकल्पनेतून तसेचं रावेर लोकसभा मतदार संघाच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या माध्यमातून वाटप करण्यात आले.त्यात बोदवड तालुक्यातील ३८ ग्रामपंचायत कार्यालये,तसेचं बोदवड शहरातील ग्रामीण रुग्णालय, तहसील कार्यालय,पंचायत समिती कार्यालय,शहरातील नगरपंचायत कार्यालय,पोलीस स्टेशन,तसेचं विविध बँका या संपुर्ण ठिकाणी ५ लिटरच्या ६८ कँड वाटप करण्यात आल्या.

यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष विनोद कोळी,पंचायत समिती सभापती किशोर गायकवाड,पंचायत समिती गटविकास अधिकारी आर.ओं. वाघ,नगरपंचायत मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले,नगरपंचायत गटनेते कैलास चौधरी,मार्केट कमिटी संचालक रामदास पाटील,यांचेसह भाजपाचे कार्यकर्ते निलेश टिकारे,रुपेश गांधी,सचिन (फिला)राजपूत, प्रदिप बडगुजर,जीवन राणे, विजय पाटील व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.