खामगावात बोगस सोयाबीन बियाणे प्लांटवर छापा !

0

खामगाव | प्रतिनिधी गणेश भेरडे 

स्थानिक गोपाळनगर भागातील घरकुल परिसरात असलेल्या योगीराज फ्लोअर मिल पँकेजिंग येथे मंगळवारी रात्री कृषी व महसूल विभागाच्या अधिकायांनी छापा मारून बोगस सोयाबीन प्रकरणी कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे़ तर सोयाबीन बियाण्यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती कृषि अधिकारी गिरी यांनी दिली़

सध्या खरीप हंगामाच्या पेरणीचे दिवस सुरू झाले आहे़ जास्तीत जास्त शेतकºयांचा सोयाबीन पिक घेण्यावर भर असतो़ तर बाजारात पुरेसे प्रमाणित सोयाबीन बियाणे उपलब्ध नाही, असलेच तर ते अव्वाच्या सव्वा भावातत मिळते़ वेळेवर बियाणे उपलब्ध होत नसल्यामुळे सैरभैर झालेल्या शेतकयांच्या अडचणीचा गैरफायदा घेण्यासाठी काही महाभाग टपून बसलेले असतात व बोगस बियाणे माथी मारून शेतकयांची आर्थिक लूट करण्यासोबतच पिकाच्या नुकसानीस कारणीभूत ठरतात़ असाच काहीसा प्रकार शहरातील गोपाळनगर भागात असलेल्या योगीराज फलोअर मिल पँकेजिंग नामक प्लांटवर होत असून येथे सोयाबीनचा कच्चा माल आणून त्याला पाँलिश मारून पीएसएम अँग्री सोल्युशन्स असे नाव छापिल असलेल्या थैल्यामध्ये अप्रमाणित बियाणे पँक करून बाजारात विकण्यासाठी नेण्यात येत असल्याची माहिती मिळताच कृषि व महसूल विभागाच्या अधिकायांनी मंगळवारी रात्री 9 वाजताचे सुमारास छापा मारून कार्यवाही सुरू केली़ सदर कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती़ याठिकाणी सुमारे 90क्विंटल सोयाबीन, 30 किलोच्या भरलेल्या 94 बँग व 52 खाली बँग आढळून आल्या़ तसेच बियाण्यांचे काही नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त झाल्यानंतरच कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषि अधिकारी गिरी यांनी सांगितले़  सदर कार्यवाही जिल्हा कृषि अधिकारी महाबळे मँडम़़, तालुका कृषि अधिकारी गिरी, यांच्यासह उपविभागीय महसूल अधिकारी राजेंद्र जाधव व तहसीलदार शितल रसाळ यांच्या पथकाने केली़ बोगस बियाणे तयार करून शेतकयांची आर्थिक लूट करणायांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे़.

Leave A Reply

Your email address will not be published.