खळबळजनक ! मुंबईतील हॉटेलात आढळला खासदाराचा मृतदेह

0

मुंबई – मुंबईच्या हॉटेलमध्ये खासदार मृतावस्थेत सापडल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. दमण आणि दीवचे खासदार मोहन डेलकर यांचा मृतदेह मरीन ड्राइव्हच्या एका हॉलेलमध्ये मिळाला. पोलिसांनी आत्महत्येची शक्यता व्यक्त केली आहे. खासदार डेलकर यांच्याजवळ गुजरातीत लिहिलेली एक चिठ्ठी आढळल्याचं समजतं.

 

मोहन डालकर दादरा -नगरहवेली मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलेले खासदार होते. डेलकर यांच्या पश्चात पत्नी कालाबेन डेलकर आणि एक मुलगाअभिनव, एक मुलगी दिविता असा परिवार आहे. 58 वर्षांचे डेलकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. 1989 पासून ते या लोकसभा मतदार संघातून निवडून येत आहेत.

 

1989 मध्ये पहिल्यांदा ते निवडून आले आणि खासदार झाले. त्यानंतर भारतीय नवशक्ती पार्टीकडून ते निवडणूक लढले. 2009 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. पण त्यानंतर त्यांनी पक्ष सोडला. 2019 ची निवडणूक ते अपक्ष म्हणूनच लढले होते आणि जिंकले होते. सात वेळा खासदार म्हणून निवडून गेलेल्या लोकसभा सदस्याचा असा संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.