क्राइम पेट्रोल’ला अनूप सोनीचा सोडण्याचा निर्णय

0

सोनी टीव्हीचा लोकप्रिय गुन्हे तपासावर आधारित कार्यक्रम ‘क्राइम पेट्रोल’ या शोचे सूत्रसंचालन करणारा टीव्ही-चित्रपट जगतातील हुशार अभिनेता अनूप सोनीने हा शो सोडण्याचा निर्णय घेतला असून अनूप सध्या नोटीस पिरियडवर आहे. आणि तो अजून काही भागांमध्ये दिसू शकणार आहे.

अनूपला या संदर्भात विचारले असता, तो म्हणाला होय, हे खरे आहे की मी शो सोडत आहे. ८ वर्षे हा खूप मोठा वेळ आहे. आतापर्यंतचा प्रवास खूप छान होता. मी या सर्वात अभिनय मिस्ड करत आहे. आधी मी अभिनेता आहे. मी गेल्या ५ वर्षांपासून अभिनय केला नसल्यामूळे चित्रपट आणि शो करण्याचा माझा विचार असल्याचे अनूपने सांगितले.

प्रेक्षकांना शोमधील अनूपच्या अनुपस्थितीची कमी नक्की जाणवेल. अनूपला या संदर्भात विचारण्यात आले. त्यावर तो म्हणतो, हो. मला माहित आहे की प्रेक्षक नाराज होतील. पण माझी स्थिती प्रेक्षकांनीही समजून घ्यावी. मी संपूर्ण जोशात प्रत्येक शो केला. पण मी माझ्यातल्या अभिनेत्याला मारू शकत नाही. माझ्या मनात या शोसाठी नेहमी स्पेशल जागा असेल. मला अभिनेता म्हणून स्वत:वर वेगवेगळे प्रयोग करायचे आहेत. अनूपने बालिका वधू, शांति, कहानी घर घर ती मध्ये काम केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.