कोरोना रूग्ण दगावला;अंत्यसंस्कार कोणी करावा म्हणुन तीन तास खोळंबा

0

जामनेर(प्रतिनीधी):- तालुक्यातील टाकरखेडा येथील कोरोनाबाधीत मरण पावलेल्या महीला रूग्णावर अंत्यसंस्कार कोणी करावे या गोंधळातच प्रशासनाचा तब्बल तीन तासाच्या वर आज खोळंबा पहायला मिळाला. विशेष म्हणजे सदर कोरोनाबाधीत ७० वर्षीय महीला रूणाचा मृत्यु सोमवार रात्री बारा वाजेच्या सुमारास झाला होता.मयत रूग्णाच्या नातेवाईकांनी पालीका व उपजिल्हा रूग्णालयाकडे संपर्क केला असता अंत्यसंस्कार कोणी करावे यावरून टोलवा-टोलवी करीत असल्याचे दिसुन आले, या गंभीर प्रकाराने नातेवाईकांमधे प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

येथील बोदवड रस्त्यावरील कोवीड सेंटरमधे पाच दिवसांपुर्वी सदर महीलेला उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.दरम्यानच्या काळात बोदवड रस्त्यावरील या कोवीड सेंटर मधील दाखल रूग्णांनी मिळणाऱ्या अपुर्ण सोयी-सुवीधांबाबत सकाळपासुन तर दुपार पर्यंत चांगलाच दांगडो केला.येथील वैद्यकीय सुवीधा,चहा,नास्ता,जेवणाबाबतही रूग्णांकडुन तक्रारी ऐकायला मिळाल्या.ईकडे मात्र प्रशासनाच्या म्हणण्यानुसार कोरोना रूग्णांना आवश्यक वैद्यकीय उपचार आणी ईतर सोयी-सुवीधा चांगल्यात चांगल्या दिल्या जात आहेत,यात कुठलाही भेदभाव करण्यात येत नाही,नियमात बसेल ती सर्व व्यवस्था येथे केली जात असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.