कोरोना पार्श्वभूमीवर एस टी बस सेवा कोलमडल्याने नोकरदारावर्गाचे हाल !

0

जळगाव (रजनीकांत पाटील) :-  जिल्ह्यात करोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य पर महामंडळाच्या एसटीची सेवासुद्धा कोलमडली असून, सेवा पूर्ववत होत असतानाच करोनाचे ग्रहण लागल्याने लालपरी अडचणीत आली. दरम्यान ५०% प्रवासी घेऊन वाहतूक करताना डिझल खर्चही निघत नसल्याने आगारातून बस फेऱ्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे आगार ओस पडले असून, नोकरीसाठी विविध ठिकाणी जाणाऱ्या नोकरदार वर्गाचे हाल होत आहेत.

गतवर्षी करोनामुळे तीन महिने एसटीची चाके थांबली होती. त्यानंतर एसटी बस सुरू करण्यात आल्या सुरवातीला पन्नास टक्के आसन क्षमतेनुसार मागील काही दिवसांपूर्वी एसटी बस सुरू करण्यात आली शासन आदेशानुसार पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली. तोवर एसटी खेडोपाडी पोहोचली सुद्धा. मात्र आता पुन्हा दुसऱ्या लाटेत एसटीची चाके खोलात जात असल्याचे दिसून येत आहे. प्रवाशांअभावी फेऱ्या रद्द होत असून, डिझेलचा खर्चही निघत नसल्याने ही सेवा बंद करण्यात आली आहे.

दरम्यान बस सेवा बंद झाल्याने नोकरदारवर्गाला प्रचंड हाल सहन करावे लागले. खासगी वाहनाने प्रवास करणे भाग पडले. अत्यावश्यक सेवेसाठी नेहमी ये जा करणारे शासकीय व निमशासकीय कर्मचारी वेळेवर पोहचत नाही  वरिष्ठांनी या बाबीकडेद लक्ष – देऊन निदान अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी तरी आगारातून बस सुरू करावी,अशी मागणी प्रवासी करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.