कोरोना तू नक्कीच हरणार.!

0

आज आम्ही आहोत
घरात कैद,
उद्या मात्र नसणार…
रे कोरोना एकदिवस
तू नक्कीच हरणार…

मिळेल ते कच्चे-पक्के
खावू आम्ही…
स्वतःला घरात
कोंडून घेवू आम्ही…
पण लढाईत या आम्ही,
नाही डगमगणार…
रे कोरोना एकदिवस
तू नक्कीच हरणार…

असतील लोक अडाणी
अन्
रूग्णालयेही कूचकामी…
मास्क लावून फिरू आम्ही,
हातही धुवू वारंवार…
पण एवढ्याशा विषाणूला,
शरण नाही जाणार…
रे कोरोना एकदिवस
तू नक्कीच हरणार…

जगभरात या आजाराने,
माजलाय हाहाकार…
बाधा झाली लाखोंना तर
मृतही हजारो-हजार…
पण भारतात मात्र तुझी
डाळ नाही शिजणार…
रे कोरोना एकदिवस
तू नक्कीच हरणार…

हरली रे इटली,
हरली ती अमेरिका…
ब्रिटनमध्ये तर आजारी,
पडलाय राजकुमार…
पण आमचा खंबीर नेत
तुझी, नांगीच आता
ठेचणार…
रे कोरोना एकदिवस
तू नक्कीच हरणार…

हिम्मत नाही तुझी आता,
कुरघोडी करण्याची…
आम्हीही करतोय तयारी,
तुला हद्दपार करण्याची…
पण तुझ्या संक्रमणाला,
भीक नाही घालणार…
रे कोरोना एकदिवस
तू नक्कीच हरणार…
नक्कीच हरणार…

कवी – विवेक उपासनी
जळगाव…

Leave A Reply

Your email address will not be published.