कोरोना चा वाढता प्रभाव लक्षात घेता पहूर येथे विनामास्क फिरणार्या २४ जणांवर दंडात्मक कारवाई

0

पहूर, ता.जामनेर (वार्ताहर) : जगाला हादरवून सोडणार्‍या कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोके वर काढले असून . कोरोना विषाणू संक्रमण रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपायोजना राबवण्यात येत आहेत.

 

याचाच एक भाग म्हणून विना मास्क फिरणाऱ्या २४ जणांवर पहूर पेठ ग्रुप ग्रामपंचायत आणि पहूर पोलिसांनी कारवाई करून त्यांच्याकडून दोन हजार चारशे रुपयांचा दंड वसूल केला .या मोहीमेत पहूर पोलीस पोलीस उपनिरीक्षक किरण बर्गे , शशिकांत पाटील ,  उपसरपंच श्याम सावळे , सरपंचपती रामेश्वर पाटील , ग्रामविकास अधिकारी डी . पी . टेमकर , माजी उपसरपंच रवींद्र मोरे, इका पहेलवान , विजय पांढरे , यांच्यासह ग्राम पंचायत सदस्य , कर्मचारी , पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.