कोरोना काळात प्रा. संजीव साळवेंकडून गरजूवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत

0

मुक्ताईनगर (प्रतिनीधी) : येथील श्रीमती जी. जी ,खडसे महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे प्रा. संजीव साळवे यांनी गरजूवंत विद्यार्थ्यासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला आहे . कोरोना काळामध्ये सर्व क्षेत्रामध्ये निराशेचे वातावरण पसरले असताना सर्व क्षेत्रामध्ये आर्थिक तंगीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील शेतकरी व मजूर यांचे शिक्षण घेत असलेल्या मुली व मुले यांना थोडीफार मदत म्हणून त्यांच्या प्रवेशाचा खर्च साळवे हे उचलणार आहेत.

विज्ञान शाखेतील एफ. वाय. बी.एससी., एस.वाय .बी एससी, टी. वाय. बीएससी या तिन्ही वर्गाचे प्रत्येकी 10 गरजूवंत विद्यार्थ्याचा प्रवेशाचा खर्च ते स्वतः उचलणार आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर समाजाचेही काही देणे आहे या उद्देशाने प्रा.साळवे यांनी मोठ्या मनाने गरजवंतांना मदतीचा हात पुढे केला आहे. तरी मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा ही त्यांनी विनंती केलेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.