कोरोनाच्या संसर्गबाबत कासोदा येथील मधुकर ठाकूर करताहेत जनजागृती

0

निपाणे, ता.एरंडोल (वार्ताहर) : सध्या कोरोनाच्या भितीने जनता भयभित झाली असून शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन लोक करु लागले आहेत. अडाणी अज्ञानी जनतेला ही कोरोणा म्हणजे काय आणि हा आजाराचा फैलाव कसा होतो व त्याचा संसर्ग रोखण्यासाठी काय उपाय करावा यासाठी कासोदा येथील मधूकर जुलाल ठाकूर यांनी निपाणे येथे सकाळी सात वाजता येवून कोरोना बाबत प्रचार प्रसार केला लॉक डाऊन पाळून घरातच राहा तसेच बाहेर निघाले तर तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधा हात वेळोवेळी साबणाने स्वच्छ धुवा घ्या काळजी आरोग्याची भिंती नाही ,कोरोणाची गर्दीच्या ठिकाणी थांबू नका, हातात हात घेवून नका, शिका खोकला ताप आल्यास त्वरीत जवळच्या सरकारी दवाखान्यात जाऊन तपासणी करून घ्यावी असे आवाहन केले.

यावेळी त्यांनी कोरोणाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध घोषणा देवून जनजागृती केली निपाणे नंतर जवखेडसिम अंतुरली येथेही सायकली वर फिरुन जनजागृती केली मधुकर ठाकूर यांनी अनेक दिवसांपासून समाज प्रबोधनाचे कार्य करत असून त्यांच्या कार्याची सामाजिक संघटनांनी तसेच शासनाने दखल घ्यावी अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून होत आहे

Leave A Reply

Your email address will not be published.