कोरोनाच्या पार्श्वभुमीवर अर्थमंत्रालयाने केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

0

दिल्ली | करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशातील महाराष्ट्रासहित ३० राज्य आणि केंद्रशासित प्रदेश संपूर्णत: लॉकडाऊन आहेत. अशा परिस्थिती आयकर आणि जीएसटी संदर्भात नागरिकांना दिलासा देणाऱ्या अनेक घोषणा अर्थमंत्रालयानं केल्या. करोनाच्या पार्श्वभूमीवर आयकर परताव्याची तारीख (२०१८-१९) वाढवून ती ३० जून करण्यात आली आहे.तसेच उशीरा कर भरणार्‍यांसाठी १२ एवजी ९ टक्के दंड आकारण्यात येईल, असं आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे.


सितारामन म्हणाल्या, ‘विवाद ये विश्वास’ या योजनेची मुदत ३० जून पर्यंत वाढवण्यात आली आहे. यासाठी अतिरिक्त १० टक्के भरण्याची गरज नाही. तसेच नोटीस, अपिल, रिटर्न फायलिंग ३० जून पर्यंत करता येणार आहे. त्यानुसार, आर्थिक वर्ष २०१८-१९ ज्यांनी रिटर्न फाईल केलेलं नाही त्यांना आता ३१ मार्चऐवजी ३० जून २०२० पर्यंत रिटर्न फाइल करता येईल. तसेच उशीरा रिटर्न फाईल करणार्यांसाठी व्याज हे १२ टक्क्यांवरुन ९ टक्के करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.