कोरोनाचा विस्फोट ! राज्यात तब्बल 43 हजार 183 नवे रुग्ण

0

मुंबई : राज्यात काल पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट पाहायला मिळत आहे. कारण, गेल्या 24 तासांत तब्बल 43 हजार 183 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 249 जणांचा आज कोरोनामुळे मृत्यू झालाय. कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या पाहिली तर थोडासा दिलासा मिळतोय. कारण, 32 हजार 641 जण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत. महाराष्ट्रात सध्या 3 लाख 66 हजार 533 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.2% झाले आहे.

 

राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 2 कोटी 85 लाख 6 हजार 163 वर जाऊन पोहोचली आहे. त्यातील 2 कोटी 43 लाख 3 हजार 368 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचा आकडा 54 हजार 898 वर जाऊन पोहोचला आहे.

 

मुंबईतील कोरोना स्थिती –

मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झालीय. गेल्या 24 तासांत मुंबईत तब्बल 8 हजार 646 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 5 हजार 31 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात मुंबईत 18 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 14 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 12 पुरुष तर 6 महिलांचा समावेश आहे. मुंबईत सध्या 55 हजार 5 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

 

मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर 84 टक्क्यांवर पोहोचलाय. तर चिंताजनक बाब म्हणजे रुग्ण दुपटीचा कालावधी 49 दिवसांवर आला आहे. 25 मार्च ते 31 मार्च दरम्यानचा कोरोना वाढीचा दर पाहिला तर तो 1.38 टक्क्यांवर पोहोचला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.