कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव-श्रीक्षेत्र सुकेश्वर येथील किर्तन सप्ताह रद्द

0

एरंडोल (प्रतिनिधी) – सध्या देशात कोरोना महामारीने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनचा वाढता प्रादुर्भाव पाहता श्रीक्षेत्र सुकेश्वर येथे सालाबादाप्रमाणे संपन्न होणारा किर्तन सप्ताह यंदा रद्द करण्यात आल्याचे आयोजकांनी कळविले आहे.

श्री क्षेत्र सुकेश्वर देवस्थान येथे  वै. ह.भ.प. नामदेव महाराज भामरे यांनी 1991 पासून स्थापन केलेल्या पुरुषोत्तम मासातील संकीर्तन सप्ताहाचे पंचमी ते द्वादशी (दि. 21/9/2020 ते 28/9/2020) असे आयोजन असते. यंदा सप्ताहचे  13 वे वर्ष आहे. परंतु  यंदा कोरोना प्रादुर्भावामुळे मंदिरे आणि धार्मिक कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे सदर संकीर्तन सप्ताह देखील स्थगित करण्यात आला असून सर्व कार्यक्रम बंद राहतील तरी सर्व कीर्तनकार, भजनी मंडळ, वारकरी, अन्नदाते, देणगीदार, पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन  सुकेश्वर कार्यकारी मंडळाने केले आहे. परंतू सप्ताहाची परंपरा खंडित होऊ नये म्हणून सप्ताह पूजन देवदर्शन कार्यक्रमासाठी शासकीय नियमांचे पालन करून  सुकेश्वर देवस्थानचे अध्यक्ष ह. भ. प. विजय नामदेव भामरे व भजनी मंडळी हे  उपस्थित राहतील असे आवाहन देखील सुकेश्वर विश्वस्त मंडळाने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.