केळीवरील व्हायरसबाबत कृषी अधिकारी, संशोधकासमोर आव्हान

0

लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज, नुकसानग्रस्त केळी बागांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी

चिनावल, ता.रावेर (वार्ताहर) : सद्यस्थितीत केळी पिकवणाऱ्या बऱ्हाणपूर पासून ते चोपडा, मुक्ताईनगर, जळगाव,कजगाव, पाचोरा भागातील केळी लागवडीवर कुकुंबर मोझेक व्हायरस ( ही.एम.व्ही .) ने मोठ्या प्रमाणावर केळी बागामधील केळी खोड काढून फेकावे लागत असल्याने केळी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

सदर रोगांवर प्रतिबंध करण्यासाठी कृषी विभाग अधिकारी , संशोधक यांचे समोर ही आव्हान असून या बाबत लोकप्रतिनिधी नी यात लक्ष घालून नुकसान ग्रस्त बागांचे पंचनामे करून नुकसान भरपाई साठी तजवीज करण्याची मागणी केळी पट्ट्यात जोर धरत आहे.
केळी वर दरसाल काहीना काही अस्मानी सुलतानी संकटे येतच आहे. यंदा ही नवीन केळीवर सी एम व्ही रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे बऱ्याच शेतकऱ्यांना त्यांच्या केळी बागातील शती ग्रस्त अनेक केळीचे खोडे उपटून फेकून द्यावे लागते. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे सदर रोगावर कृषी विभागामार्फत ही ठोस अशी उपाययोजना पाठवा औषधी फवारणी ट्रीटमेंट नाही. कृषी विभागामार्फत केवळ मावा किडीमुळे या रोगाचा प्रसार होतो यासाठी प्राथमिक अवस्थेतच मावा किड रोखणाऱ्या औषधी फवारणी करण्याची मार्गदर्शन केले जाते मात्र कृषी विभागातील अधिकारी कृषी तज्ञ संशोधक यांना सदर वायरसचे समूळ उच्चाटन होण्यासाठी पर्याय दिसत नसून यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.

लागवड केलेल्या खेडी बागांमधून हजारो केळी खोडे उपटून फेकून द्यावे लागत असल्याने शेतकऱ्यांनी लागवड साठी त्यात असलेल्या ठिबक सिंचन मोटर पंप साठी लागणाऱ्या विजेवर होणारा खर्च आंतर मशागत फवारणी खर्च ड्रिंचिग खर्च मोठ्या प्रमाणावर केला गेला आहे. हा सर्व खर्च वाया जाणार असल्याने संबंधित कृषी विभाग महसूल विभाग यांनी तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची मागणी परिसरात दूर जात आहे. तर संबंधित लोकप्रतिनिधींनी याबाबत शासन दरबारी केळी उत्पादकांचे होणारे नुकसान बघता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बागांचे पंचनामे करून भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी होत आहे. तर कृषी विभागाने केळी उत्पादकांना सदर रोगाचे उच्चाटन होण्यासाठी लवकरात लवकर योग्य ते मार्गदर्शन व औषध फवारणी चे तजवीज करावी अशी मागणी जोर धरत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.