केंद्र सरकारने सुडबुद्धीनं सुरक्षा हटवण्यासारखा निर्णय घेतला : रोहित पवार

0

मुंबई: राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानाची सुरक्षा केंद्र सरकारने हटवली आहे. दरम्यान, यावर आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना किंवा कोणता नेता देशासाठी महत्त्वाचा आहे, त्यांना सरकारने सुरक्षा पुरवणं आवश्यक आहे. सुडबुद्धीनं सुरक्षा हटवण्यासारखा निर्णय घेण अयोग्य आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री नसतानाही त्यांना सुरक्षा देण्यात आल्याचे रोहित पवार म्हणाले.

दरम्यान रोहित पवार यांनी फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. असे प्रकार घडत असतील तर यापुढे सर्वसामान्यांचेही फोन केले जाऊ शकतात. यावर चाप लावणं आवश्यक आहे. सरकार त्या दृष्टीनं नक्कीच प्रयत्न करेल अशी अपेक्षा असल्याचे रहित पवार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.