केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद दहिवले यांचा जळगाव जिल्हा दौरा निश्चित

0

जळगाव :   केंद्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद दहिवले यांचा जळगाव जिल्हा दौरा दिनांक २० आणि २१ जून २०२१ रोजी नियोजित केलेला आहे. दिनांक २० जून रोजी सकाळी दहा वाजता राष्ट्रीय संघटन सचिव  शिवचरण उज्जैनकर सर मुक्ताईनगर यांच्या निवासस्थानी संघटनेच्या कार्या विषयी चर्चा त्यानंतर आदिशक्ती संत मुक्ताईदर्शन त्यानंतर माजी महसूल तथा कृषी मंत्री एकनाथराव खडसे साहेब यांची सदिच्छा भेट त्यानंतर एक वाजता बोदवड येथे डॉ.प्रशांत बडगुजर जिल्हा सहसचिव यांच्या निवासस्थानी केंद्रीय मानवाधिकार संघटनेच्या कार्यालयाचे उद्घाटन आणि वृक्षारोपण त्यानंतर दुपारी तीन वाजता भुसावल तेथे भुसावल व रावेर, यावल तालुका कार्यकारणी सोबत चर्चा आणि त्याच दिवशी नशिराबाद येथे मुक्काम याप्रसंगी जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त सभासद करण्याविषयी सुद्धा चर्चा केली जाणार आहे.

दिनांक २१ जून २०२१ रोज सोमवारला सकाळी आठ ते दहा या वेळात जळगाव जिल्हा तसेच तालुका कार्यकारणीच्या पदाधिकाऱ्यांची चर्चा व सत्कार समारंभ त्यानंतर पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथे पद्मश्री तथा मॅगसेसे पुरस्कार विजेत्या नीलिमाताई मिस्त्रा यांच्या हस्ते आणि राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद दहिवले यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रीय संघटन सचिव श्री शिवचरण उज्जैनकर सर यांना दोन महिन्यापूर्वी जाहीर झालेल्या ग्लोबल पीस युनिव्हर्सिटी अमेरिकाच्या मानद डॉक्टरेटने श्री उज्जैनकर यांना सन्मानित करण्यात येणार आहे तसेच केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे समाज भूषण पुरस्काराने जळगाव जिल्हा सचिव प्रा. राजकुमार कांकरिया सर तथा जळगाव तालुका उपाध्यक्षा सौ. ज्योतीताई राणे मॅडम यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष श्री संजु भटकर सर उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख श्री राजेश पोतदार उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री राजेश सैनी उत्तर महाराष्ट्र महासचिव प्राचार्य जगदीश सूर्यवंशी उत्तर महाराष्ट्र संघटक श्री भागवतशेठ राठोड  जळगाव जिल्हा अध्यक्ष डॉ. अजय पाटील सचिव राजकुमार कांकरीया सहसचिव डॉ. प्रशांत बडगुजर जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुख श्री ईश्वर महाजन सर जळगाव तालुका अध्यक्ष श्री किशोर पाटील सर सचिव श्री अजयकुमार पाटील मुक्ताईनगर तालुका अध्यक्ष श्री विनायक वाडेकर सर बोदवड तालुका अध्यक्ष श्री सुभाष शुरपाटणे रावेर तालुका अध्यक्ष श्री महेंद्र महाजन  सन्माननीय अध्यक्ष तथा पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असल्याचे या दौऱ्याचे मुख्यआयोजक तथा केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय संघटन सचिव श्री शिवचरण उज्जैनकर सर यांनी कळवले आहे तसेच या कोरोना लॉकडाऊनच्या काळामुळे ग्लोबल पीस युनिव्हर्सिटीचा पदवीदान समारंभ होऊ न शकल्यामुळे हा सोहळा बहादरपुर तालुका पारोळा येथे आयोजित असुन केंद्रीय मानवाधिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सुचित करण्यात येते की केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंदजी दहिवले यांच्या विविध ठिकाणच्या दौऱ्या प्रसंगी आपणास शक्य असल्यास त्या ठिकाणी अवश्य उपस्थिती द्यावी असेही श्री शिवचरण उज्जैनकर सर यांनी कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.