कृष्णापुरीतील हिवरा नदी पुलावर पुरुषांसाठी मुतारी नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय

0

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा शहरातील कृष्णापुरी भागातून पाचोरा शहरामध्ये प्रवेश असून या भागातील हिवरा नदी वरील पुलावर नदीला आलेल्या पुरा मध्ये मुतारी वाहून गेली असून मुख्य रस्त्यावर असलेल्या रहदारी मुळे मुतारी नसल्यामुळे स्थानिक नागरिक तसेच ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय झाली असून वेगळे चित्र निर्माण झाले आहे.

 

पावसाळा संपल्यानंतर देखील पाचोरा नगरपालिका प्रशासनाच्या वतीने कुठलीही मुतारी बांधली नसून यामध्ये नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष बघायला मिळाले आहे. यासंबंधी स्थानिक नगरसेवक विकास पाटील यांना विचारणा केली असता सदर नदीच्या पुरामध्ये मुतारी वाहून गेल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली आहे.  यासाठी पाचोरा नगरपालिकेच्या माध्यमातून ५ लाख रुपये किंमतीची अद्यावत मुतारी बांधणार असून या संबंधित वर्कऑर्डर तयार आहे. परंतु यामध्ये तांत्रिक अडचण अशी आहे की, हिवरा नदीवरील पुलाचे काम लवकरच सुरू होणार असून आमदार निधी मधून हा पूल मंजूर करण्यात आला आहे.

 

यामध्ये नगरपालिकेचे कुठलेही नुकसान होऊ नये म्हणून आपण पाच लाख रुपये किंमतीची  मुतारी बांधणार आणि पुलाचे काम सुरू झाल्यावर मुतारी तोडावी लागणार अशी परिस्थिती निर्माण व्हायला नको म्हणून मुतारी चे काम थांबले आहे. लवकरच यामधून मार्ग काढून मुतारी बांधण्यात येईल असे नगरसेवक विकास पाटील यांनी सांगितले आहे. यामध्ये परिस्थितीचा आढावा घेतला असल्यास कृष्णापरी परिसरामध्ये मुतारी अत्यंत गरज असून यावर पाचोरा नगरपालिका प्रशासनाने सकारात्मक विचार करून तात्काळ मुतारी तयार करून नागरिकांची गैरसोय थांबावी अशी मागणी स्थानिक नागरिकांच्या वतीने पाचोरा नगरपालिकेला अर्जाद्वारे केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.