किनगावचा पशुवैद्यकिय दवाखाना स्वच्छतेसह डॉक्टरांच्या प्रतिक्षेत

0

यावल : तालुक्यातील पश्चिम भागातील सर्वात मोठ्या बाजारपेठेचे गाव म्हणजे ब-हाणपूर अंकलेश्वर माहामार्गा लगत असलेले किनगाव हे गाव आहे. तर किनगावला लागुण असलेल्या १७ गावांचा संपर्क या गावाशी आहे म्हणून जिल्हा परीषदेने येथे भव्य प्रथमश्रेणी पशुवैद्यकिय दावाखाना उभारला आहे.

मात्र या दवाखाण्यात गेल्या २ महीण्यांनपासून येथे गुरांना आरोग्यसेवा देण्यासाठी डाँक्टरच नसल्यामुळे परीसरातील गुरांना उपचार मिळत नाही म्हणून परीसरातील शेतकरी हैराण झाले आहेत किनगाव येथे प्रथमश्रेणी पशुवैद्यकिय दवाखाना असल्यामुळे किनगावला लागुन असलेले चिंचोली,आडगाव,कासारखेडे,मनापुरी,गिरडगाव,डोणगाव आणी वाघोदा या गावांच्या गुरांना आरोग्य सेवा देण्यासाठी हा प्रथमश्रेणी दवाखाना सुरू करण्यात आला आहे.

मात्र येथे पशुवैद्यकिय आधीकारीच नसल्याने परीसरातील शेतकरी तिव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.किनगाव येथे असलेल्या पशुवैद्यकिय दवाखाण्यात वैद्यकिय आधीकारीनाही हेतर सोडा परंतु या दवाखाण्यात घाणीचे साम्राज्य इतके वाढले आहे की गुरांचे आरोग्य सुधारणेतर लांबच उलट जर येथे उपचारासाठी गुर आली तर गुरांनसह मानसांच्या आरोग्यालाही धोका होऊ शकतो इतकी वाईट परीस्थीती या पशुवैद्यकिय दवाखाण्याची झाली आहे शासनाने येथे कायमस्वरूपी पशुवैद्यकिय आधीकारी दिले नाहीत म्हणून येथे प्रभारी पशुवैद्यकिय आधीकारी आहेत व त्यांना किनगावच्या पशुवैद्यकिय दवाखाण्यात पुर्णवेळ देता येत नाही व परीसरातील गुरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

तर परीसरातील गुरांनवर लाळखुरगटीचा आजार आहे मात्र उपचारा अभावी गुरांचा जिव धोक्यात आला आहे तसेच शासनाच्या वेळापत्रकानुसार हा दवाखाना फेब्रूवारी ते सप्टेबर या कालावधीत सकाळी ७ ते १२ व दुपारी ४ ते ६ अशी वेळ आहे तर आँटोबर ते जानेवारी या कालावधीत दवाखाण्याची वेळ सकाळी ८ ते १२ व सायंकाळी ३ ते ५ वाजेपर्यंत अशी वेळ असतांना मात्र हा दवाखाना नेहमी बंदच असतो म्हणून गुरांचे आरोग्य अधीक धोक्यात आले आहे तरी वरीष्ठ आधीकारी यांनी या विषयाची गंभीर दखल घेऊन किनगाव पशुवैद्यकिय दावाखाण्यात तात्काळ  कायमस्वरूपी पशुवैद्यकिय आधीकारी नियुक्त करावा व परीसरातील गुरांच्या आरोग्याशी होत असलेला हा खेड थांबवावा अशी मागणी परीसरातील शेतकरी करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.