काॅंग्रेसच्यावतीने सानंदांच्या नेतृत्वात 9 नोव्हेंबर रोजी खामगांवात टॅक्टर रॅलीचे आयोजन

0

खामगांव:- केंद्रातील मोदी सरकारने नव्या कृशी विधेयकाच्या नावाखाली 3 नवे कायदे लागु केले आहे. त्याचप्रमाणे कामगार बांधवांविरोधात सुध्दा नवा कायदा तयार करुन षेतकरी व कामगार बांधवांचे जीवन उद्ध्वस्त करण्याचे शडयंत्र रचले आहे. या कायद्यांविरोधात भारतीय राष्टीय काॅंग्रेस पक्षाने देशभरात जनव्यापी आंदोलन छेडले असून शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे रदद् करण्याच्या मागणीसाठी काॅंग्रेसच्या वतीने खामगांवात माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दि.09 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी 10 वाजता टॅक्टर रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

नांदुरा रोडवरील गोकुळ नगर येथील संत तुकाराम महाराज सभागृहाच्या प्रांगणावरुन या टॅक्टर रॅलीला सुरुवात होवुन जलंब नाका, सिव्हील कोर्ट समोरुन, हिंदुसुर्य महाराणा प्रतापसिंह पुतळा, टाॅवर चैक येथुन सी.एम.हेल्थ क्लब समोरुन, एकबोटे चैक, सहेली काॅम्प्लेक्स,  फरशी,मोहन टाॅकीज चोक, महावीर चैक,टिळक पुतळा, नगर परिशद समोरुन, बस स्थानक चोक, शर्मा हाॅस्पीटल समोरुन, विकमसी चोक मार्गे स्व.विलासरावजी देशमुख कृशी संकुल,टीएमसी यार्ड येथे रॅलीचा समारोप होणार आहे. रॅलीमध्ये माजी आमदार राणा दिलीपकुमार सानंदा यांच्यासह काॅंग्रेस नेते सहभागी होवुन मार्गदशन करणार आहे. तरी शेतकरी व कामगार विरोधी कायदे रदद् करण्याच्या मागणीसाठी आयोजित या टॅक्टर रॅलीमध्ये षेतकरी, कामगार बांधव व काॅंग्रेसजणांनी मोठया संख्येने सहभागी होवुन आपल्या देशातील अन्नदात्याचा, कामगार बांधवांचा आवाज बुलुुंद करावा असे आवाहन खामगांव तालुका काॅंग्रेस कमिटीचे अध्यक्ष डाॅ.सदानंद धनोकार, शेगांव तालुका  काॅंग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष विजय काटोले यांच्यासह काॅंग्रेसच्या विविध संघटना सेलचे अध्यक्ष व पदाधिकायांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.