कासोदा येथील बाजार गेल्या तिनं महिन्यापासून भरत नसल्याने जनतचे हाल

0

निपाणे, ता.एरंडोल (वार्ताहर) : कासोदा हे गाव ग्रामीण भागाचे बाजार पेठ असून मंगळवारी येथे दिवसभरासाठी मोठा बाजार भरतो. मात्र कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर संसर्ग  रोखण्यासाठी प्रशासनाने गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून हा बाजार भरवणेच बंद केल्याने ग्रामीण भागातील जनतेची मोठी गैरसोय होत आहे सध्या बाजार बंदमुळे किराणा दुकानदारांनी रुपयाचा सव्वा रुपया करुन ग्राहकांना लुटले आहे.

त्याच प्रमाणे भाजी पाला वाल्यांनी ही लाक डाउनचा फायदा ऊचलून मोठी कमाई करत असल्याचे दिसत आहे कोरोनाच्या नावाखाली राजरोसपणे कृत्रिम टंचाई भासवून ग्राहकांला फसवले जात आहे याबाबत शासनाकडून नियम अटी बनवण्यात आल्या असल्या तरी श्रिमंत व्यापारी लोकांचे काही साठे लोटे असल्यामुळे हे लोक कुणाला जुमानत नाहीत कारवाई लाही घाबरत नाहीत. त्यामुळे ग्राहकांची प्रचंड लुट होतांना दिसते तरी याबाबत शासनाने विचार करून मंगळवारी कासोदा बाजार भरवण्यासाठी विचार करावा अशी मागणी जन सामांन्यांकडून करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.