कार्यकारी अभियंत्यांकडून दिशाभूल, जलशक्तीचे कामे रद्द करा

0

जि.प.सदस्या पल्लवी सावकारेंची मागणी

 जळगाव: डीपीसीकडून जि.प.साठी तरतूद करण्यात आलेल्या १८ कोटींच्या निधीतूनच केंद्राच्या जलशक्ती योजनेसाठी साडेसात कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नियोजित निधीतून बचत झालेल्या पैशातून जलशक्तीचे काम करण्याबाबत नियोजनच्या बैठकीत निर्णय झालेला असतानाही केवळ दोन तालुक्यांसाठीच जि.प.च्या निधीतून जलशक्तीवर खर्च करण्यास जलव्यवस्थापन समितीने बुधवारी परवानगी दिली आहे. मात्र लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता आर.के.नाईक यांनी समितीची दिशाभूल करून नियमबाह्यरित्या निधी खर्च करण्याची परवानगी मिळविल्याचे आरोप करत नाईक यांच्यावर कारवाई करण्यात येऊन जलशक्तीचे कामे रद्द करण्यात यावी अशी मागणी भाजपच्याच जि.प. तथा जलव्यवस्थापन समिती सदस्या पल्लवी सावकारे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी  जि.प.अध्यक्षा रंजना पाटील यांना पत्र दिले आहे.

जलशक्तीसाठी स्वतंत्र साडेसात कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला नाही. जि.प.च्या १८ कोटींच्या निधीतूनच साडेसात कोटींचा निधी जलशक्तीसाठी वळविण्यात आला आहे. यात रावेर आणि यावल या दोन तालुक्यातीलच कामे होणार असून उर्वरित १३ तालुक्यांवर हा अन्याय होणार आहे. त्यामुळे जलशक्तीचे कामे रद्द करण्यात यावी अशी मागणीही पल्लवी सावकारे यांनी  केली आहे.  स्थायी समितीने निधी खर्च करण्यास स्थगिती दिलेली असताना कार्यकारी अभियंता आर.के.नाईक यांनी जलव्यवस्थापन समिती आणि नवनियुक्त जि.प.अध्यक्ष यांची दिशाभूल केली असल्याचे आरोप पल्लवी सावकारे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.