कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! यावर्षी होणार जबरदस्त वेतन वाढ

0

मुंबई :  जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. यावर्षी कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात वेतन वाढ मिळण्याची शक्यता एका अहवालातून व्यक्त करण्यात आली आहे. वृत्तानुसार यामध्ये भारत. चीन, रशिया आणि ब्राझील या देशांमधील कर्मचाऱ्यांच्या वेतनात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

मंगळवारी ग्लोबल प्रोफेशनल सर्व्हिसेस कंपनी एऑन पीएलसीने भारतातील सेव्हरी ग्रोथविषयीचा आपला ताजा अहवाल प्रसिद्ध केला. सर्वेक्षण केलेल्या ८८ टक्के कंपन्यांनी सांगितले की, २०२१ सालातील त्यांच्या कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये वाढ करण्याचा त्यांचा मानस आहे. वर्ष २०२० मध्ये असे म्हणणार्‍या कंपन्यांची संख्या ७५ टक्के होती.

 

या अहवालातून देण्यात आलेल्या माहितीमुळे कर्मचारी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेल्या वर्षी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ६.१ टक्क्यांची वाढ झाली होती. त्यापेक्षा यावर्षी होणारी वाढ ही अधिक असल्याचे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालातून दिसून येत आहे.

 

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, या सर्वेक्षणात २० उद्योगांमधील १ हजार २०० पेक्षा अधिक कंपन्यांना सामील करून घेण्यात आले होते. या सर्वेक्षणानुसार जास्त प्रमाणात वेतनवाढ होण्याचे संकेत मिळाले आहेत. याचबरोबर नव्या कायद्यामुळेही काही बदल होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.