एरंडोल येथे नवजात शिशु बाळ संजीवनी मुलभूत प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

0

एरंडोल (प्रतिनिधी) :जळगाव बालरोगतज्ञ संघटना व एरंडोल तालुका मेडिकल असोसिएशन यांच्या  संयुक्त विद्यमाने  विनामूल्य नवजात शिशु बाळसंजिवणी मूलभूत प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.भारतीय  बालरोगतज्ञ व नवजात शीशुतज्ञ संघटना यांच्याद्वारे प्रायोजित  प्रशिक्षण कार्यशाळेची सुरुवात एरंडोल च्या हॉटेल कृष्णा इन येथे रविवारी दिनांक 17 रोजी सकाळी  9 वाजता मान्यवरांच्या हस्ते धन्वंतरी पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली.

बाळ जन्माच्या पहिल्या गोल्डन मिनिटात बाळाची योग्य काळजी घेतल्यास व बाळ श्वास घेत नसल्यास बॅगमास्क प्रणालीचा वापर केल्यास आपण 95% बाळाचे जन्मानंतर गुदमरणे व त्यामुळे होणारे मृत्यू टाळू शकतो. असे डॉ.अविनाश भोसले चैतन्य हॉस्पिटल जळगाव समन्वयक आणि प्रशिक्षक यांनी नमूद केले. या प्रशिक्षणात प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे प्रात्यक्षिक दाखवून व प्रत्येक प्रशिक्षणार्थी कडून प्रात्यक्षिक करून घेतले गेले.प्रशिक्षक म्हणून अमरावती येथील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. श्रीपाद जहागीरदार,नागपूर येथील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. संजय देशमुख,नाशिक येथील बालरोगतज्ञ डॉ.सचिन पाटील व जळगाव येथील प्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ.अविनाश भोसले हे होते.सदर कार्यशाळेत सकाळी 9 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत एरंडोल, धरणगाव, कासोदा, पाचोरा,पाळधी, भडगाव येथील बाल बालरोगतज्ञ,स्रीरोगतज्ञ, नर्सेस व इतर कर्मचारी आदी 40 प्रशिक्षणार्थींनी भाग  घेतला.कार्यक्रमास

डॉ.संजीव चौधरी अध्यक्ष,डॉ. नरेश नारखेडे सचिव,डॉ.वृषाली सरोदे सहसचिव,डॉ.विश्वेश खडके कोषाध्यक्ष व जळगाव बालरोगतज्ञ संघटना यांचे सहकार्य लाभले.ग्रामीण भागात येऊन प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून प्रशिक्षण दिल्याबद्दल मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.सुधीर काबरा,सचिव डॉ.राहुल वाघ यांनी विशेषता डॉ.अविनाश भोसले समन्वय व प्रशिक्षक जळगाव व सर्व प्रशिक्षकांचे  असोसिएशन तर्फे आभार मानले.

सदर प्रशिक्षणात सर्व प्रशिक्षणार्थींची परीक्षा घेऊन त्यांना असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुधीर काबरा,सचिव डॉ.राहुल वाघ व सर्व मान्यवरांच्या  हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.