एरंडोल ग्रामीण रुग्णालयातील आहार सेवा बंदच!

1

एरंडोल (प्रतिनिधी) : येथील ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना व सोबतच्या एका नातेवाईकास पुरविण्यात येणारी मोफत आहार सेवा कित्येक महिन्यांपासून बंद पडल्याने रुग्ण व नातेवाईकांची मोठी गैरसोय होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून आहार सेवा सुरु करण्यासाठी अपयशी ठरलेल्या कंत्राटदार संस्था श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवाभावी संस्था नाशिक या संस्थेवर प्रशासन कारवाईचा बडगा उचलेल का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

याबाबत सविस्तर असे की, शासनाने जळगाव जिल्ह्यातील रुग्णालय, उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय, कुटीर रुग्णालयात  उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्ण व त्यांच्या सोबतच्या नातेवाईकास आहार सेवा पुरविण्याचे कंत्राट नाशिक येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवाभावी संस्था, नाशिक यांना सन 2019 पासून देण्यात आले आहे सदर संस्थेला कंत्राट मिळाले तेव्हा सुरवातीच्या काळात फक्त तिन महिने रुग्ण व त्या सोबतच्या नातेवाईकांना आहार सेवा पुरविण्यात आली त्यानंतर आजपर्यंत ही आहार सेवा बंदच आहे. यामुळे रूग्णालयात उपचारासाठी दाखल होणारे रुग्ण, प्रसूती साठी दाखल होणाऱ्या महिलांना व नातेवाईकांना आहार सेवा मिळत नसल्याने मोठी गैरसोय होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून रुग्णालयातील आहार सेवा बंद असून देखील रुग्णांसाठी आहार सेवा सुरु करुन घेण्यासाठी एकही लोकप्रतिनिधी समोर आले नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

 

कंत्राटदार संस्थेवर कारवाईची अपेक्षा

रुग्ण व नातेवाईक यांना आहार सेवा पुरविण्याबाबत नाशिक येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवाभावी संस्था यांना शासनाच्या आरोग्य विभागाने पात्र केले असतांना जिल्ह्यातील एरोडल येथील ग्रामीण रुग्णालयात आहार सेवा पुरविण्यात सदर संस्था सपशेल अपयशी ठरल्याने या संस्थेचे कंत्राट तात्काळ रद्द करून काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. एरंडोल ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ कैलास पाटील यांच्या शी मोबाईल फोन वर सम्पर्क केले असतांना त्यांनी फोन उचलला नाही

1 Comment
  1. Shailesh says

    एरंडोल ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिक्षक डॉ. कैलास पाटलांना मोबाईलवर कॉल केल्यास ते कोणताच कॉल घेत नाहीत…

Leave A Reply

Your email address will not be published.