एकनाथराव खडसे व रोहिणीताई खडसेंच्या दणक्याने जिल्ह्यातील कंत्राटी डॉक्टरांचे 4-5 महिन्यांचे थकीत वेतनाचा प्रश्न सुटला

0

जिल्ह्यातील शेकडो डॉक्टरांना वेतन झाले अदा..

रोहिणी खडसेंच्या पाठपुराव्याला यश, राज्यातील बहुतांश जिल्ह्यातील कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांचाही थकीत वेतन प्रश्न मार्गी

मुक्ताईनगर : मागील 2-3 आठवड्यांपुर्वी जिल्ह्यातील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मा. महसूल-कृषीमंत्री मा. एकनाथरावजी खडसे व जिल्हा बैंकेच्या अध्यक्षा सौ. रोहिणीताई खडसे-खेवलकर यांची भेट घेऊन थकीत वेतन मिळण्याकरीता आपण शासन दरबारी आमचा प्रश्न मार्गी लावावा म्हणुन विनंती केली होती.

त्या अनुषंगाने जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ऍड.रोहिणी खडसेंनी शासनाचे प्रतिनिधि म्हणुन जिल्हाधिकारी श्री अभिजीत राऊत यांना भेटुन –
कोरोना महामारीच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र आरोग्यसेवा बजावणारे जिल्ह्यासह राज्यातील सुमारे 1200 कंत्राटी वैद्यकीय अधिकारी तसेच हजारो आरोग्य कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन गेल्या चार-पाच महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे सर्व डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. राज्य सरकारने तातडीने रखडलेले वेतन अदा करावे, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसंदर्भात निवेदन दिलेले होते. निवेदन देतेवेळी जळगाव जि.परीषदेचे आरोग्य सभापति श्री रविंद्र पाटिल, कंत्राटी डॉक्टरांचे प्रतिनिधि म्हणुन तदर्थ/कंत्राटी वैद्यकीय अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ.अभिषेक ठाकुर, जि.प. मागासवर्गीय आरोग्य कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष श्री.आर.एस.अडकमोल, जिल्हा सचिव श्री मिलिंद लोणारी यांच्यासह इतर आरोग्य कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थिती होते.
दरम्यान, माननीय एकनाथरावजी खडसे साहेबांनी आरोग्य मंत्री ना. रोजेश टोपे यांच्यासोबत भ्रमणध्वनिव्दारे संवाद साधुन जिल्ह्यासह राज्यातील स्थायी व कंत्राटी वैद्यकीय अधिकारी तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन लवकर देण्यात यावे म्हणुन चर्चा केली होती., त्यावर आरोग्य मंत्र्यांनी राज्यातील कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांकरीता येत्या आधिवेशनात विशेष निधीची तरतुद केली जाईल व येत्या 1-2 आठवड्यात डॉक्टरांसह सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे थकीत मासिक वेतन देऊ असे आश्वासन दिले होते.

दरम्यान कंत्राटी डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर ऍड.रोहिणी खडसे यांनी एनआरएचएमचे आयुक्त श्री. एन.रामास्वामी आणि राज्य कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ.अर्चना पाटील यांच्याशी कंत्राटी डॉक्टर्सच्या थकीत वेतनाबाबत फोनवर चर्चा केली होती. त्यावेळी एन. रामास्वामी यांनी तातडीने जळगाव जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पोटोडे यांच्याशी चर्चा केली. राज्य सरकारकडून निधी उपलब्ध नसल्याचा मुद्दा डॉ. पोटोडे यांनी अवगत करून दिल्यानंतर एन. रामास्वामी यांनी याप्रश्नी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलणे केले होते.
त्यानंतर आज जिल्ह्यातील शेकडो कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खात्यावर मासिक वेतन जमा करण्यात आल्याने जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला जात आहे.

त्याचप्रमाणे आपल्याला वेतन मिळण्याकरीता शासनदरबारी आपले राजकीय वजन वापरुन आमच्या समस्या मांडल्याबद्दल मा.महसुलमंत्री एकनाथराव खडसे, जिल्हा बैंकेच्या अध्यक्षा मा.रोहीणीताई खडसे-खेवलकर व ज्यांनी आमच्या वेतनांकरीता तरतुद केले ते सन्माननीय आरोग्य मंत्री ना.राजेशजी टोपे, एन.आर.एच.एम. चे आयुक्त श्री एन.रामास्वामी, राज्य कुटुंब कल्याण विभागाच्या अतिरिक्त संचालक डॉ. अर्चना पाटील, जिल्हाधिकारी श्री.अभिजीत राऊत , जि.प.चे सीईओ डॉ.बी.एन.पाटील, जि.प.आरोग्य सभापति श्री रविंद्र पाटिल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दिलीप पोटोडे यांचे आभार व्यक्त केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.