उर्मिला मातोंडकर अभिनयासाठी नाही सॉफ्ट पॉर्नसाठी परिचित-कंगना रनौत

0

मुंबई : प्रख्यात अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आपल्या अभिनयासाठी ओळखली जात नसून ती ‘सॉफ्ट पॉर्नस्टार’ असल्याची हीन भाषेतील टीका अभिनेत्री कंगना रनौत हिने केली आहे. कंगनाने तोंडसुख घेतल्यानंतर मनोरंजन विश्वातून उर्मिला मातोंडकर यांची पाठराखण केली जात आहे.

‘उर्मिला मातोंडकर… ती सॉफ्ट पॉर्नस्टार आहे. मला माहित आहे की हे अत्यंत निंदनीय आहे. पण ती निश्चितच तिच्या अभिनयासाठी परिचित नाही. उर्मिला मातोंडकर कशासाठी ओळखली जाते? सॉफ्ट पॉर्नसाठी… बरोबर ना? जर तिला तिकीट मिळू शकतं, तर मला (तिकीट) का नाही मिळणार?’ असं कंगना टाइम्स नाऊ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती. उर्मिला मातोंडकर यांनी संपूर्ण मुलाखतीत आपल्या संघर्षाचा अवमान केल्याचा दावाही कंगनाने केला.

‘संपूर्ण देश ड्रग्जच्या विळख्यात आहे. हिमाचल प्रदेश हे ड्रग्जचे उगमस्थान असल्याची तिला (कंगना) कल्पना आहे का? तिने स्वतःच्या राज्यातून सुरुवात केली पाहिजे’ अशी टीका उर्मिला मातोंडकर यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत केली होती. ‘क्या उखाड दोगे, किसके बाप का राज है, अशी भाषा कोणती सुसंस्कृत मुलगी वापरते? तिच्या ऑफिसवर झालेली कारवाई निंदनीयच आहे, त्याला माझा पाठिंबा नाही. पण तिला पुरवलेली वाय प्लस सुरक्षा आमच्याच पैशातून आहे. भाजपकडून निवडणुकीची उमेदवारी मिळवण्यासाठी ती त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत आहे.’ असा टोला उर्मिला मातोंडकर यांनी लगावला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.