उत्तरप्रदेशच्या राज्यपालपदी आनंदीबेन पटेल

0

नवी दिल्ली – केंद्र सरकारने काही राज्यांचे राज्यपाल बदलले असून काही राज्यांमध्ये नव्याने राज्यपालांच्या नियुक्‍त्या केल्या आहेत. त्यानुसार मध्यप्रदेशच्या राज्यपाल आंनदीबेन पटेल यांची उत्तरप्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यांच्याकडील मध्यप्रदेशच्या राज्यपालपदाचा कार्यभार बिहारचे विद्यमान राज्यापाल लालजी टंडन यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. बिहारच्या राज्यपालपदी फागू चौहान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रमेश बैस यांची त्रिपुराच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आर.एन. रवि यांना नागालॅंडचे राज्यपाल करण्यात आले आहे. जनता दलाचे माजी आमदार जगदीप धनखर यांना पश्‍चिम बंगालचे राज्यपाल करण्यात आले आहे. राष्ट्रपतींनी त्यांच्या नियुक्‍त्यांची अधिसूचना आज जारी केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.