आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल रुख्मिणी मंदिरावर रोषणाई; फराळाचे वाटप होणार

0

चाळीसगाव :- आषाढी एकादशी निमित्त शहरातील पवारवाडी स्थित विठ्ठल-रुख्मिणी मंदिराला विश्वस्तांकडून आकर्षक रोषणाई करण्यात आली असून आज त्यानिमित्त भाविकांना फराळाचे वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती विश्वस्त मंडळाने दिली आहे

शहरातील  पवार वाडीत प्रशस्त असे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आहे या मंदिरात विठ्ठल-रुक्मिणीच्या आकर्षक मूर्ती असून मंदिर सभागृहात  संतांच्या व महादेव हनुमान यांचे  देखील छोटे छोटे मंदिर आहेत या मंदिरात आषाढी एकादशी निमित्त दि १२  रोजी पहाटे पासून विठ्ठल रुक्मिणी ला अभिषेक करण्यात येणार आहे पहाटे ५  वाजता भजन संध्या  तर दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सायंकाळी ५ वाजता विठ्ठल रुख्मिणी मंदिर विश्वस्त मंडळाच्या वतीने पवारवाडी परीसरात पालखी पर्दशना होते  आषाढी एकादशी निमित्त मंदिराच्या विश्वस्तां कडून फराळाचे वाटप करण्यात येणार आहे भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे विश्वस्त भिकन  पवार .विश्‍वास पवार .डॉ तुळशीराम पाटील.बाळु पवार. बबन पवार. गणेश पवार.सुनिल पवार .सतीश पवार .निंबा पाटील .सुरेश पवार. दिलीप पवार. रमेश पवार.अशोक चपके .नाना शिंगटे .रामदास पवार यांनी केले आहे

Leave A Reply

Your email address will not be published.