आयटी इंजिनीअरची बाराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

0

पुणे :- राहाटणी येथील एका आयटी इंजिनीअरनं बाराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली आहे. राहाटणी रॉयल ग्रीन सोसायटीमध्ये ही घटना घडली. रोहित बापूराव पाटील असं २८ वर्षीय संगणक अभियंत्याचं नाव आहे. एका दुर्धर आजाराने ग्रासले होते त्या नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

रोहित हा इलेक्ट्रिक इंजिनिअर असून तो हिंजवडी येथील एका कंपनीत कामाला होता. तो त्याच्या भावासोबत रहाटणी येथे राहत होता. दरम्यान आत्महत्यापुर्वी गुरुवारी दुपारी रोहितचा भाऊ कामाला गेला होता तर त्याची वाहिनी घरात होती. दरम्यान तो घरातून इमारतीच्या बाराव्या मजल्यावरील गच्चीवर आला.तेथून त्याने उडी मारली त्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. याप्रकरणी वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.