आमडदे येथे नाल्यातील बॅकवॉटर ने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान

0

भडगाव  (प्रतिनिधी) : तालुक्यातील आमडदे येथील भडगाव रस्त्यावरील कुरणे नालाला पुर आल्याने त्यापुढील नाला त्याचे पाणी घेत नसल्याने या परिसरातील शेती चे नुकसान झाले आहे. या मध्ये शेतकरी पंकज भगवानदास झंवर यांचेगट नंबर 718 ,भीमराव मुकुंदा भोसले गट नंबर 719 व 725 यांच्या शेतातून नाला पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत जातो. कुरणे नाला हा सर्वात मोठ्या पांड्या नाल्याला पुढे मिळत असल्याने पूर आल्यास कुरणे नाल्यातील पाणी पांड्या नाल्यात समाविष्ट होत नाही. व ते पाणी संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात येते.

15,16 व 17 जुलैला सलग तीन दिवस पाऊस असल्याने दोन्ही नाल्यांना पूर आला,त्यामुळे कुरण नाल्याचे पाणी संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात आल्याने, मोठ्या प्रमाणात पिकांचे व शेतीचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी भडगाव तहसिलदार माधुरी आंधळे व अधिकारी एस एस पाटील यांना निवेदन दिले आहे. तलाठी शिंदे यांनी शेतीची पाहणी करून पंचनामा केला आहे. या बाबत शेतकऱ्यांनी नाल्याची योग्य त्या उपाययोजना करून तात्काळ नाल्यावरील पुराचे पाणी वारंवार शेतात घुसणार नाही त्याबाबतीत नियोजन करावे. दरवर्षी पुराचे पाणी शेतात घुसल्याने शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसाणीपासून वाचवावे.अन्यथा संबंधित शेतकरी भडगाव तहसिल समोर उपोषणास बसणार आहेत या वेळी पंकज झंवर, परेश झंवर,संजय झंवर,भीमराव पाटील,गुलाबराव पाटील,दिगंबर पाटील,उत्तम बच्छाव,सौ. प्रतिभा पाटील आदी शेतकऱ्यांचे सह्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.