आता ‘त्या’ पोलिसाला आणि संबंधित अधिकाऱ्याला कपडे काढून मनसे चोप द्यावा लागेल

0

मुंबई/जळगाव : जळगाव स्थित गणेश कॉलनी भागातील शासकीय आशादीप महिला वसतीगृहात मुलींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणावरुन मनसेने संबंधित पोलीस आणि अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे.

 

मनसेच्या नेत्या रुपाली पाटील फेसबुकद्वारे म्हणाल्या की, जळगाव महिला वसतिगृहमध्ये पोलिसांसमोर महिलेला कपडे काढून नाचवत आहे. या प्रकरणाला संबंधित विभाग जबाबदार आहे. त्यामुळे सदर पोलीसाला आणि अधिकाऱ्याला त्वरीत निलंबित करा, अशी मागणी रुपाली पाटील यांनी केली आहे. अन्यथा आता आम्हाला त्या पोलिसाला आणि संबंधित अधिकाऱ्याला कपडे काढून मनसे चोप द्यावा लागेल, असा इशारा देखील रुपाली पाटील यांनी दिला आहे.

 

महिला व बालकल्याण विभागामार्फत गणेश कॉलनीतील वसतिगृहात निराधार व अन्याय, अत्याचार झालेल्या महिला व मुलींच्या निवारा-भोजनाची व्यवस्था केली जाते. या वसतिगृहात गैरप्रकार घडत असल्याच्या तक्रारी होत्या. जननायक फाउंडेशनचे अध्यक्ष फिरोज पिंजारी, फरीद खान, मंगला सोनवणे आदींनी मंगळवारी दुपारी वसतिगृह गाठून महिला व मुलींना भेटून माहिती जाणून घेतली असता १ मार्च रोजी काही पोलीस कर्मचारी व बाहेरील पुरुष यांनी मुलींना कपडे काढून जबरदस्तीने नृत्य करायला भाग पाडले.

 

सदर घटनेची चौकशी चालू आहे-

जळगावमधील आशादीप वसतीगृहात घडलेला प्रकार दुर्दैवी आहे. घटनेची चौकशी करण्यासाठी चार उच्चस्थरीय अधिकाऱ्यांची समिती गठीत करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. चौकशी झाल्यानंतर दोन दिवसांत तात्काळ कारवाई करणार असल्याचे आश्वासन अनिल देशमुख यांनी आज अधिवेशनात दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.