आठवले मंत्रिमंडळात : भुसावळात रिपाई पदाधिका-यांचा फटाके फोडून जल्लोष

0

भुसावळ :- रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची मित्र पक्ष म्हणून केंद्रीय मंत्री मंडळात मंत्री म्हणून राष्ट्रपती भवनात प्रांगणात शपथविधी झाला. याबद्दल भुसावळात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)च्या पदाधिकारी व कार्यकर्त्ये यांच्यसह आंबेडकरी जनतेने ढोल ताश्यांच्या गजरात फटाक्यांची आतषबाजी करीत तसेच मिठाई (लाडू) वाटून जल्लोष साजरा केला.

रिपाईचे उत्तर महाराष्ट्र नेते रमेश मकासरे यांच्या नेतृत्वात दि३१ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास प्रांताधिकारी कार्यलयासमोर विजयोत्सव साजरा करन्याय आला. यावेळी पप्पू सुरळकर, भगवान निरभवणे, विश्वास खरात, सुनील अंभोरे, प्रशांत सोनवणे, बापू सोनवणे, लक्ष्मण जाधव, भीमराव वाघ, गौरव सुरवाडे, प्रकाश तायडे, प्रकाश ढिवरे, सुधीर दांडेकर, प्रशांत झाल्टे चंदू वासनिक यांचेसह पदाधिकारी व कार्यकर्त्ये उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.