आगग्रस्त महिलेला महापौर-उपमहापौरांकडून मदतीचे आश्‍वासन

0

जळगाव । शहरातील रामेश्‍वर कॉलनी परिसरातला रेणुका नगरात आज सकाळी घराच्या वरच्या मजल्यावर असणार्‍या पार्टीशनला भीषण आग लागून यात भाड्याने राहत असलेल्या विधवा महिलेचे वस्तू जळून खाक झाल्या आहेत. यामुळे निराधार महिलेचा संसार उघड्यावर आला आहे. यानंतर महापौर सौ. जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आपल्या सहकार्‍यांसह भेट घेऊन तिला मदतीचे आश्‍वासन दिले.

रेणुकामाता नगरात असलेल्या भीकन निंबा चौधरी यांच्या घराच्या वरच्या मजल्यावर असणार्‍या पार्टीशनच्या घराला आज सकाळी अकस्मात आग लागली. यात शेड जळून खाक झाले. यामध्ये रेखा पिंटू भालेराव ही महिला आपल्या दोन मुलांसह राहत होते. या महिलेचे पती वारले असून ती एकटीच आपल्या दोन्ही मुलांसह या पार्टीशनयुक्त घरामध्ये वास्तव्यास होती. आपले घर जळून खाक झाल्याची दिसताच त्या महिलेला भोवळ आली. परिसरातील नागरिकांनी तिला धीर दिला.

दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच महापौर सौ. जयश्री सुनील महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी तातडीने या महिलेची भेट घेतली. याप्रसंगी त्यांच्या सोबत नगरसेवक गणेश सोनवणे, नगरसेवक प्रशांत नाईक, शिवसेना महिला आघाडीच्या शोभाताई चौधरी, ललीत धांडे यांची उपस्थिती होती. आगीमुळे या महिलेचा संसार उघड्यावर आला असल्याने ती या मान्यवरांना पाहून रडू लागली. महापौर जयश्री महाजन यांनी त्यांना धीर दिला. तर उपहापौर कुलभूषण पाटील यांनी या नुकसानीचा शासनातर्फे तातडीने पंचनामा करण्यात येऊन त्या महिलेला मदत केली जाईल असे आश्‍वासन दिली. तर, नगरसेवक गणेश सोनवणे यांनी आगग्रस्त महिलेला तातडीने पाच हजार रूपयांची मदत देखील दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.