आई-वडील दवाखान्यात उपचार घेत असताना 13 दिवस संपर्कात राहून कुठलाही संसर्ग नाही

0

भडगाव (सागर महाजन) : भडगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक फौजदार राजेंद्र दिनकरराव पाटील पाटील हे भडगाव येथे कटुंबासह राहता. त्यांचे आई- वडिल भास्कर नगर पाचोरा तालुका पाचोरा येथे रहायला असून राजेंद्र पाटील यांनी covisheild ची पहिली लस दिनांक-14/02/2021,दुसरी लस दिनांक-15/03/2021, या दिवशी घेतली त्यांच्या आईचे नाव- चंद्रभागाबाई दिनकरराव पाटील (वय-78)

आई ह्या दिनांक 12/ 03/ 2021 रोजी पोझीटीव्ह आल्या. त्यांना दम लागत होता आणि छाती खूप दुखत होती श्वास घ्यायला त्रास होत असल्याने डॉक्टर सागर गरुड यांचे  मंगलमूर्ती हॉस्पिटल कडे तपासणी केली असता त्यांनी मला HRCT टेस्ट करायला संगीतले, HRCT केला त्यात 19 स्कोर आला, डॉक्टरांनी मला आई कोरोना पोझीटीव्ह असल्याबाबत चे कळविले त्यानंतर मी डॉक्टर सागर गरुड यांच्याकडे आईला उपचार करण्यासाठी मंगलमूर्ती हॉस्पिटलमध्ये  दाखल केले. उपचार चालू असताना मला दिनांक 21.03.2021 रोजी वडिलांचा फोन आला वडिलांना खोकला, आणि छाती दुखण्याचा त्रास होत होता. आईला दवाखान्यात ऍडमिट करून वडिलांकडे आलो वडिलांना लगेच डॉक्टर भूषण मगर यांचे विघ्नहर्ता हॉस्पिटल दवाखान्यात तपासणी केली असता वडिलांना देखील तोच त्रास होत होता, वडीलां ना डॉक्टरांनी चेक केले असता डॉक्टर बोलले की, यांना देखील कोरोणाचे लक्षणे त्यांचा hrct स्कोर 25 होता.  त्यांना देखील डॉक्टर भूषण मगर हॉस्पिटल येथे अ‍ॅडमिट केले. परंतु 2 दिवस अ‍ॅडमिट होते वडील नामे दिनकरराव भाऊराव पाटील वय 83 यांचे दिनांक 22.03.2021 रोजी रात्री 10.00 वाजता दवाखान्यात मयत झाले.

मी पूर्णतः उपचार चालू असताना रात्र दिवस मंगलमूर्ती, विघ्नहर्ता हॉस्पिटल पाचोरा येथे हजर राहून आई बरी होईपर्यंत मी तिथेच थांबलो  वडीलांचे अंत्यसंस्कार केले.  दिनांक-28/03/2021 रोजी डॉक्टर यांनी आई चे वय जास्त असल्याने ऑक्सिजन लेवल 90 चे पुढे वाढत नसल्याने डॉक्टर यांनी आई हिस घरी घेवून जाण्यास सांगितले त्या दिवशी माझे वडील यांचे पाचव्या दिवशी दशक्रिया विधी साठी धावपळ करीत होतो. आई चा डिसचार्ज झाला त्यावेळी ऑक्सिजन ची आत्यंत आवश्यकता होती माझे पोलीस स्टेशन चे सहकारी मित्र पोलीस नाईक लक्ष्मण अरुण पाटील, व पो.काँ. ईश्वर पंडित पाटील , होमगार्ड शेख यांनी ऑक्सिजन उपलब्ध करून सतत 10 दिवस आई ला ऑक्सिजन घरी पुरविले त्याच्या अनमोल सहकार्य मुळे माझी आई आज सुस्थितीत आहे.  मी कोविड-19 vaccine चे covishield लस चे दोन्ही डोस घेतले असल्याने मला 13 दिवस रुग्णालयात व वडील व आई च्या सतत संपर्कात राहून सुद्धा कोरोणाची कोणतीही लागण झाली नाही. तरी मी विनंती करतो की स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी लस घ्या.

Leave A Reply

Your email address will not be published.