आंबेडकरी चळवळींना उध्वस्थ करण्याचे सरकारचे षडयंत्र -जगन सोनवणे

0

झोपडपट्टी धारकांना न्याय मिळवून देण्यासाठी २ जूनला काढणार महामोर्चा
भुसावळ ;- राज्यातील आंबेडकरी चळवळीचे बालेकिल्ल्याना उध्वस्त करण्याचे षडयंत्र राज्य सरकारकडून होत असल्याचा आरोप पीआरपीचे महामंत्री जगन सोनवणे यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली . ज्या ठिकाणी दलित, मुस्लिम, बहुजन समाज जास्त आहेत. त्या ठिकाणी झोपडपट्टी भागातील झोपड्या हटविण्याचा प्रयत्न होत असून बहुजन समाज विखुरला जाईल असाही प्रयत्न होत आहे. शहरातही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी येथील झोपडपट्टी धारकांना न्याय मिळवून देण्यासाठी दि. २ जून रोजी सकाळी ११ वाजता  येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी लॉंगमार्चचे आयोजन करुन जेलभरो आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जगन सोनवणे यांनी  दिली.

येथील शासकीय विश्रामगृहात दि.२४ मे रोजी झोपडपट्टी बचाव समितीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी रिपाइं (ग) जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, दलित पँथरचे सुदाम सोनवणे, रिपाइंचे शहर सोनवणे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुन्ना सोनवणे, सिद्धार्थ सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते बाळा पवार, मनोहर सुरळकर, मौलाना अ.आजिम मकरानी, बरकत अली यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील झोपडपट्टी धारकांसाठी आपण विविध दहा ठिकाणी रेल्वे रोको केले होते. झोपडट्टे वाचविण्यासाठी परिपूर्ण प्रयतन्न केला आहे. गरिबांसाठी आंदोलने केली आहेत. मैदान सोडून पळालो नाही.‘अच्छे दिनचा नारा’ लावून सत्तेत आलेल्यांनीही गरिबांना आधार दिलेला नाही.भाजपाचे जिल्ह्यात दोन खासदार, आमदार आहेत त्यांनीही झोपडपट्टी वाचविण्यासाठी ठोस पाऊले उचललेली नाहीत.स्थानिक झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन कर्‍यासाठी दि.२ जून रोजी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानापासून  शहरातील प्रमुख मार्गाने नाहाटा महाविद्यालय व तेथून जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येंने लॉंगमार्चचे आयोजन करण्यात आले आहे.  मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यानंततर जेलभरो आंदोलन करण्यात येईल. राज्य शासनाने झोपडपट्टी धारकांचे पुर्नवसन करावे म्हणून करो या मरोची ही लढाई सुरु करण्यात आली आहे.जेल भरो आंदोलनानंतर झोपडपट्टी धारकांसाठीच्या जागेचा ७/१२ उतारा मिळेपर्यंत आमरण उपोषण केले जाणार आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर झोपडपट्टी धारकांचे संसार थाटणार आहे. न्यायासाठी न्यायालयीन व रस्त्यावरची लढाई असल्याचे ही जगन सोनवणे यांनी सांगितले.

राजू सूर्यवंशी यांनी, झोपडपट्टीचा लढा जाती किंवा राजकारणासाठी  नाही. रेल्वेला मोठी करणारी ही झोपडपट्टी आहे. आता रेल्वेचे बळ वाढल्याने झोपडपट्टी हटविण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे सांगत न्याय मिळेपर्यंत संघर्ष करणार असल्याचे सांगितले.लॉंगमार्च दरम्यान आंदोलकांच्या आरोग्याविषयी निर्माण होणार्‍या अडचणी व अप्रिय घटनांसाठी जिल्हा प्रशासन जबाबदार राहील असा ईशाराही त्यांनी दिला. याप्रसंगी सिद्धार्थ सोनवणे, सुदाम सोनवणे, मुन्ना सोनवणे यांनी माहिती दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.