आंध्रात चंद्राबाबूंना मोठा धक्का : मुख्यमंत्रीपदही जाण्याची शक्यता?

0

हैदराबाद :- केंद्रात तिसऱ्या आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या चार दिवसआधी विरोधी पक्षांची मोट बांधणारे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसमचे नेते चंद्राबाबू नायडू यांना मोठा धक्का बसताना दिसत आहे. लोकसभआ निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलांमध्ये टीडीपीला २५ पैकी एकाच जागेवर आणि विधानसभेच्या १७५ जागांपैकी टीडीपीला केवळ २९ जागांवर आघाडी मिळताना दिसत असून आंध्रात जगमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेस क्लिन स्वीप करताना दिसत आहे. लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीतही चंद्राबाबूंना सपाटून मार खावा लागल्यानं त्यांचं मुख्यमंत्रीपदही जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सुरुवातीच्या कलांमध्ये आंध्र प्रदेशातील २५ पैकी २४ जागांवर जगमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखालील वायएसआर काँग्रेसला आघाडी मिळाली असून तेलगू देसमला केवळ एकाच जागेवर आघाडी मिळताना दिसत आहे. टीडीपीला विजयवाडा लोकसभा मतदारसंघातच आघाडी मिळताना दिसत आहे. विशेष म्हणजे विजयवाडा येथे टीडीपीने केवळ १२१५ मतांची आघाडी घेतील आहे. त्यामुळे मतमोजणीच्या इतर फेऱ्यांमध्ये त्यातही बदल होण्याची शक्यता आहे. हा ट्रेंड असाच राहिल्यास आंध्रप्रदेशात वायएसआर काँग्रेसची त्सुनामी रोखणं चंद्राबाबूंना अवघड जाईल, असं राजकीय निरिक्षकांचं म्हणणं आहे. आंध्रप्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा देण्यात चंद्राबाबू अपयशी ठरल्याने त्यांच्याविरोधात नाराजी होती. शिवाय त्यांनी निवडणुकीत भाजपबरोबरच काँग्रेसलाही चार हात दूर ठेवल्याने मतांची मोठी विभागणी झाल्याने चंद्राबाबूंना फटका बसत असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. त्या तुलनेत जगमोहन रेड्डी यांनी सतत आंदोलनं केल्याने जनमत वळवण्यात त्यांना यश आल्याचंही जाणकार सांगतात.

Leave A Reply

Your email address will not be published.