अर्थमंत्र्यांचे बजेट ऐकूण संसदेत कंटाळलेल्या राहुल गांधींचे फोटो व्हायरल

0

मुंबई | सोमवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत बजेट सादर केले. बजेटमध्ये जाहीर केल्या जाणाऱ्या गोष्टींकडे देशातील जनतेसह विरोधी पक्षाचे लक्ष लागले होते. यादरम्यान संसदेत उपस्थित असणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही लक्ष वेधून घेतले आहे. त्यांना ट्विटरवर मोठ्याप्रमाणात ट्रोल केलं जात आहे.

बजेट सादर होत असताना राहुल गांधी कंटाळलेले दिसून आले. नेमका त्यांचा तो फोटो कॅमेऱ्यात कैद झाला. यानंतर हा फोटो सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला. यावर वेगवेगळे मजेशीर कॅप्शन देत नेटकऱ्यांनी मीम्स तयार केले आहेत.


फोटोत राहुल गांधी मास्क घालून डोक्याला हात लावून बसले आहेत. तसेच त्यांचे डोळे झाकत आहेत. या पेंगुळलेल्या अवस्थेतील राहुल गांधी यांचा फोटो नेटकऱ्यांना मिळताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडला आहे.

नेटकऱ्यांनी शेअर केलेल्या मीम्स पोस्टला मजेशीर कॅप्शन दिले आहेत. यासाठी त्यांनी राहुल गांधी यांच्या जुन्या फोटोचा संदर्भ घेतला आहे. यामध्ये ते डोळा मारताना दिसतात. जुना आणि आताचा फोटो एकत्र करून पहिला फोटो बायोलॉजी क्लासमध्ये आणि दुसरा फोटो मॅथ्स क्लासमध्ये असे कॅप्शन देण्यात आले आहे.


राहुल गांधी यांच्या मीम्सवर तुफान कमेंट करण्यात येत आहेत. यामध्ये जेव्हा आपली मैत्रीण तीच्यासोबत मित्राला डेटला घेऊन येते तेव्हा अशीच अवस्था होते. तसेच एकाने जल्दी बोल जर्मनी निकलना है असं म्हणत राहुल गांधी यांची खिल्ली उडवली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.