अमळनेर येथील शासकीय कापूस खरेदी केंद्र पुन्हा सुरु होणार ; माजी आ.स्मिता वाघ*

0

अमळनेर (प्रतिनीधी) : तालुक्यातील शेतकऱ्यांकडील कापूस खरेदी पुन्हा एकदा सुरु होणार असून सोमवारपासून शहरातील लामा जिनर्स येथे शासकीय कापूस खरेदी सुरु होणार असल्याचे माजी आ स्मिता वाघ व सभापती यांनी कळविले आहे. तसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणात कापूस शेतकऱ्याकडे शिल्लक असल्याने पारोळा रोहित जिनर्स येथे देखील कापूस खरेदीसाठी परवानगी मिळावी अशी मागणी देखील मा.आ.स्मिता वाघ यांनी केली आहे. यामुळे कापूस उत्पादक शेतकरी वर्गाला दिलासा मिळणार आहे.

तालुक्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबलेली कापूस खरेदी आ.स्मिता वाघ यांच्या प्रयत्नानंतर सुरु झाल्यानंतर शासकीय कापूस खरेदी केंद्राचे आगी मुळे झालेले नुकसान व निसर्ग चक्रीवादळाच्या तड़ाख्या मुळे शासकीय कापूस खरेदी संपूर्ण महाराष्ट्रात बंद झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली होती.

आ.स्मिता वाघ यांनी जिल्ह्याचे नूतन जिल्ह्याधिकारी अभिजीत राउत यांची नियुक्तिच्या पहिल्याच दिवशी भेट घेत जिल्यातील शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी केली होती त्यानुसार सोमवार पासून लामा जिनर्स येथे कापूस खरेदी करण्यात येणार आहे.

दरम्यान शेतकऱ्यांनी बाजार समिति ने कळविल्या नुसार कापूस विक्री साठी आणावा असे आवाहन बाजार समिति सभापती प्रफुल्ल पवार व संचालक मंडळा ने केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.